युएईमध्ये सध्या इंटरनॅशनल लीग टी-20 स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला भारताचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार डॉली चायवाला याने चहा पाजवला. या प्रसंगाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
शोएब अख्तरने आपल्या सोशल मीडियावरून डॉली चायवालासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ सुरू करताना शोएब अख्तर म्हणाल की, "आमचा खूप चांगला आणि प्रिय मित्र नागपूरहून आला आहे, तो खूप प्रसिद्ध आहे, डॉली." पुढे अख्तर डॉली चायवाला याला विचारतो, तू माझे सामने पाहिलेस का?
यावर उत्तर देताना डॉली म्हणतो, “होय सर, मी तुमचे अनेक सामने पाहिले आहेत. तुम्ही वेगवान गोलंदाज आहात. मग अख्तरने डॉलीच्या चहाचे कौतुक केले आणि म्हणाला, 'चहा खूप छान लागला.”
डॉली चायवाला बिग बॉसमध्येही दिसला आहे. डॉलीने बिल गेट्स यांनाही त्याचा चहा पाजला आहे. त्यानंतर डॉलीला खूप प्रसिद्धी मिळाली. आता त्याने आपल्या चहाची चव शोएब अख्तरला चाखायला लावली आहे.
शोएब अख्तरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, तो पाकिस्तानसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला. अख्तरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
अख्तरने कसोटीत ८२ डावात १७८ विकेट घेतल्या. याशिवाय, एकदिवसीय सामन्यात शोएबने १६२ डावात गोलंदाजी करताना २४७ विकेट्स घेतल्या. टी-20 इंटरनॅशनलच्या उर्वरित १५ डावांमध्ये त्याने १९ विकेट्स घेतल्या.
संबंधित बातम्या