T20 World Cup 2024 : भारताकडे किती सुपरस्टार आहेत याने फरक पडत नाही… ब्रायन लारा असं का म्हणाला? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : भारताकडे किती सुपरस्टार आहेत याने फरक पडत नाही… ब्रायन लारा असं का म्हणाला? वाचा

T20 World Cup 2024 : भारताकडे किती सुपरस्टार आहेत याने फरक पडत नाही… ब्रायन लारा असं का म्हणाला? वाचा

Published May 31, 2024 06:52 PM IST

Brian Lara On Indian Cricket Team : भारतीय संघाने शेवटची ICC ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती, परंतु त्यानंतर ICC ट्रॉफी जिंकण्यात भारताला अपयश आले आहे. १० वर्षांचा दुष्काळ भारतीय संघ कसा संपवणार? वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा याने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

T20 World Cup 2024 : भारताकडे किती सुपरस्टार आहेत याने फरक पडत नाही… ब्रायन लारा असं का म्हणाला? वाचा
T20 World Cup 2024 : भारताकडे किती सुपरस्टार आहेत याने फरक पडत नाही… ब्रायन लारा असं का म्हणाला? वाचा

Brian Lara On Indian Cricket Team T20 WC 2024 : टी-20 वर्ल्डकप २०२४ साठी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह २० संघ सज्ज झाले आहेत. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टी-20 वर्ल्डकपचे १६ सामने यूएसएमध्ये खेळले जाणार आहेत, तर उर्वरित ३९ सामने कॅरेबियन बेटांवर खेळले जातील.

२ जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवू शकणार का? हा खरा प्रश्न आहे.

वास्तविक, भारतीय संघाने शेवटची ICC ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती, परंतु त्यानंतर ICC ट्रॉफी जिंकण्यात भारताला अपयश आले आहे. १० वर्षांचा दुष्काळ भारतीय संघ कसा संपवणार? वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा याने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

शेवटच्या क्षणी भारतीय संघ चूक करतो

ब्रायन लारा म्हणाला की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अनुभवी खेळाडूंनी भरलेला आहे यात शंका नाही, पण टी-२० विश्वचषकात त्याचा फायदा होईल का? ब्रायन लारा म्हणाला की, भारतीय संघात मोठी नावे असली तरी विश्वचषक जिंकण्यासाठी योग्य आणि अचूक रणनीती असणे अत्यंत आवश्यक आहे.

असे झाल्यास भारतीय संघाचा १० वर्षे आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपुष्टात येईल. ब्रायन लारा पुढे म्हणतो की, वनडे विश्वचषक असो की टी-२० विश्वचषक... टीम इंडियाचे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतात, पण शेवटच्या क्षणी भारतीय संघ चूक करतो.

संघात किती सुपरस्टार आहेत हे महत्त्वाचे नाही

ब्रायन लारा पुढे म्हणाला की, तुमच्या संघात किती सुपरस्टार आहेत हे महत्त्वाचे नाही, तुम्ही विश्वचषक कसा जिंकणार आहात हे महत्त्वाचे आहे? तुमची रणनीती काय आहे...

मला विश्वास आहे की भारतीय संघाचे प्रशिक्षक खेळाडूंना एकत्र आणण्यात यशस्वी होतील आणि टीम इंडिया टी-20 विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होईल. नुकतेच भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ जवळपास १० वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या