Do You Know : चॅम्पियन्स ट्रॉफी का खेळली जाते? या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Do You Know : चॅम्पियन्स ट्रॉफी का खेळली जाते? या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या

Do You Know : चॅम्पियन्स ट्रॉफी का खेळली जाते? या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या

Jan 25, 2025 06:54 PM IST

Champions Trophy Facts : चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्यांदा १९९८ मध्ये आयोजित करण्यात आली होती. जे देश कसोटी क्रिकेट खेळत नाहीत त्यांच्यासाठी पैशाची व्यवस्था करणे हा या मागचा मुळ उद्देश होता, जेणेकरून त्या देशात क्रिकेटचा विकास होत राहील.

Do You Know : चॅम्पियन्स ट्रॉफी का खेळली जाते? या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या
Do You Know : चॅम्पियन्स ट्रॉफी का खेळली जाते? या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या

Champions Trophy History : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यावेळी पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. ही स्पर्धा १९९८ मध्ये पहिल्यांदा खेळली गेली होती. पण चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्देश काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ही स्पर्धा का आयोजित केली जाते?

आज आम्ही तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित तीन रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील. 

चॅम्पियन्स ट्रॉफी का खेळली जाते?

वास्तविक, चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्यांदा १९९८ मध्ये आयोजित करण्यात आली होती. जे देश कसोटी क्रिकेट खेळत नाहीत त्यांच्यासाठी पैशाची व्यवस्था करणे हा या मागचा मुळ उद्देश होता, जेणेकरून त्या देशात क्रिकेटचा विकास होत राहील.

चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित मनोरंजक माहिती

चॅम्पियन्स ट्रॉफीत किती संघ खेळतात?

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये किती संघ सहभागी होतात हे तुम्हाला माहीत आहे का? चॅम्पियन्स ट्रॉफी ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते, मात्र या स्पर्धेत विश्वचषकाइतके संघ खेळत नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल ८ संघ सहभागी होतात.

याशिवाय इतर संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जात नाही. या स्पर्धेची सुरुवात गट टप्प्यातील सामन्यांनी होते. यानंतर बाद फेरीचे सामने खेळवले जातात. तसेच, एकदिवसीय क्रमवारीतील टॉप-८ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटांचे संघ आपापल्या गटातील संघांशी एकदा खेळतात, त्यानंतर दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत पोहोचतात.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास 

चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय स्वरूपात खेळली जाते. ही स्पर्धा १९९८ मध्ये पहिल्यांदा खेळली गेली. त्यावेळी बांगलादेशने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले होते. यानंतर ही स्पर्धा २०००, २००२, २००४, २००६, २००९, २०१३ आणि २०१७ मध्ये खेळली गेली.

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाची कामगिरी

भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर टीम इंडिया आतापर्यंत एकदाच चॅम्पियन बनला आहे. याशिवाय टीम इंडिया एकदा संयुक्त विजेती ठरली आहे. 

तर टीम इंडियाला दोनदा फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे भारताने एकूण ४ वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपर्यंत मजल मारली आहे, परंतु केवळ दोनदाच यश मिळवले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या