मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Watch : जेव्हा दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल पहिल्यांदा जिममध्ये भेटले… आरसीबीनं शेअर केला खास व्हिडिओ, पाहाच!

Watch : जेव्हा दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल पहिल्यांदा जिममध्ये भेटले… आरसीबीनं शेअर केला खास व्हिडिओ, पाहाच!

May 24, 2024 03:51 PM IST

Dinesh Karthik Retirement : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिनेश कार्तिकच्या निवृत्तीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका त्याच्याबद्दल बोलताना दिसत आहे.

Watch : जेव्हा दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल पहिल्यांदा जिममध्ये भेटले… आरसीबीनं शेअर केला खास व्हिडिओ, पाहाच!
Watch : जेव्हा दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल पहिल्यांदा जिममध्ये भेटले… आरसीबीनं शेअर केला खास व्हिडिओ, पाहाच!

दिनेश कार्तिकने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. अशा प्रकारे दिनेश कार्तिकच्या जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट झाला. दिनेश कार्तिकने शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला होता.

ट्रेंडिंग न्यूज

त्याचवेळी या यष्टिरक्षक फलंदाजाने व्यावसायिक क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिनेश कार्तिकच्या निवृत्तीचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल त्याच्याबद्दल बोलताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल सुरुवातीचे दिवस आठवत आहे, जेव्हा दोघे पहिल्यांदा जिममध्ये भेटले होते. दीपिका पल्लीकल सांगते की, ते वर्ष २०१३ होते… आम्ही पहिल्यांदा जिममध्ये भेटलो होतो, याशिवाय आम्ही एकत्र ट्रेनिंग करायचो. ती पुढे म्हणते की, एक काळ असा होता की दिनेश कार्तिक भारतीय संघातून बाहेर पडला होता, तेव्हा परिस्थिती त्याच्या मनाप्रमाणे नव्हती. पण या यष्टिरक्षक फलंदाजाने हार मानली नाही, स्वतःवर मेहनत घेतली, त्यानंतर टीम इंडियाचा कॉल आला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली'.

दरम्यान आता कार्तिकसाठी बनवलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

दिनेश कार्तिकची कारकीर्द

दिनेश कार्तिकने २००४ मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. अशा प्रकारे तो जवळपास २० वर्षे व्यावसायिक क्रिकेट खेळत राहिला. २६ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, दिनेश कार्तिकने ९४ एकदिवसीय आणि ६० टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

याशिवाय त्याने आयपीएलमध्ये विक्रमी २५७ सामने खेळले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यतिरिक्त, दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात लायन्सचा भाग होता

टी-२० वर्ल्डकप २०२४