Dinesh Karthik : दिनेश कार्तिकनं भारताच्या टी-२० विश्वचषक संघाचं दार ठोठावलं, हैदराबादविरुद्धच्या खेळीची सर्वत्र चर्चा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Dinesh Karthik : दिनेश कार्तिकनं भारताच्या टी-२० विश्वचषक संघाचं दार ठोठावलं, हैदराबादविरुद्धच्या खेळीची सर्वत्र चर्चा

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकनं भारताच्या टी-२० विश्वचषक संघाचं दार ठोठावलं, हैदराबादविरुद्धच्या खेळीची सर्वत्र चर्चा

Updated Apr 16, 2024 05:25 PM IST

Andy Flower On Dinesh Karthik: दिनेश कार्तिकने आयपीएल २०२४ मध्ये अशीच फलंदाजी सुरू ठेवली तर त्याला भारताच्या टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळण्याची चांगली संधी आहे, असे आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर म्हणाले.

Royal Challengers Bengaluru's Dinesh Karthik
Royal Challengers Bengaluru's Dinesh Karthik (ANI )

IPL 2024: दिनेश कार्तिक भारताच्या टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. आयपीएलमध्ये आपला शेवटचा हंगाम खेळणारा कार्तिक सर्वात वयोवृद्ध सक्रिय भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने दिनेश कार्तिकने २००४ मध्ये भारतीय टी-२० संघात पदार्पण केले होते, असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर म्हणाले.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या मागील आवृत्तीनंतर कार्तिक भारताकडून खेळलेला नाही. परंतु, आयपीएल २०२४ मध्ये त्याने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यावरून क्रिडाविश्वात नव्या चर्चेत आले आहेत. या हंगामात तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने ७ सामन्यात २०५ च्या स्ट्राईक रेटने २२६ धावा केल्या आहेत.

KKR vs RR: कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज लढत, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध च्या विक्रमी २८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ १० षटकांत ५ बाद १२२ धावांवर संघर्ष करत होता. त्यानंतर कार्तिकने अवघ्या ३५ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांसह ८३ धावांची शानदार खेळी केली. यजमान संघाला ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारता आली.या सामन्यात बंगळुरुचाा २५ धावांनी पराभव झाला. परंतु, अँडी फ्लॉवर दिनेश कार्तिकच्या खेळीने प्रभावित झाले. दिनेश कार्तिक भारताच्या टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

KKR vs RR Live Streaming: कोलकात्यासमोर राजस्थानचे आव्हान; कधी, कुठे पाहायचा लाईव्ह सामना?

आरसीबीचा या वर्षातील सात सामन्यांतील हा सहावा पराभव आहे, परंतु फ्लॉवर म्हणाले की, ते सामन्यातून सकारात्मक गोष्टी घेतील आणि आगामी सामन्यात पुनरागमन करतील.मधल्या फळीत आम्ही ज्या प्रकारे लढलो त्याचा मला अभिमान आहे. आम्ही सामना हरलो, पण आम्ही ज्या पद्धतीने लढलो, त्याचा मला अभिमान वाटला, असे अँडी फ्लॉवरने म्हटले. आरसीबी आयपीएलमधील आपला आगामी सामना रविवारी ईडन गार्डन्सवर खेळणार आहे.

आरसीबीचा संघ:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विषक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, मोहम्मद सिंह, स्वप्नील सिराज, कर्ण शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, आकाश दीप, राजन कुमार, टॉम करन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, कॅमेरॉन ग्रीन, मनोज भंडागे, हिमांशू शर्मा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग