Parl Royals vs Durban Super Giants : दिनेश कार्तिक याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या बॅटची ताकद अजूनही तशीच आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये खेळत आहेय या स्पर्धेतील त्याने त्याची सर्वात मोठी खेळी खेळली आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कार्तिकने आपल्या खेळीच्या बळावर पार्ल रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला.
SA20 मध्ये पार्ल रॉयल्सची सुरुवात पराभवाने झाली होती. पण या पराभवानंतर पार्ल रॉयल्सने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर, त्यांनी पाठोपाठ खेळलेले सर्व ६ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत हा संघ सध्या SA20 च्या गुणतालिकेत अव्वल आहे.
पार्ल रॉयल्सने सोमवारी (२७ जानेवारी) झालेल्या या सामन्यात डरबन सुपर जायंट्सचा ६ गडी राखून पराभव केला. या संघाचा लीगमधला हा निश्चितच सलग सहावा विजय आहे पण एकूण ८ सामन्यांमधला हा ७वा विजय आहे.
या सामन्यात प्रथम खेळताना दुबई सुपर जायंट्स संघाने २० षटकात ७ विकेट गमावत १४३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पार्ल रॉयल्सने १ चेंडू राखून १४४ धावांचे लक्ष्य गाठले. पार्ल रॉयल्ससाठी तीन फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दिनेश कार्तिकसोबतच लुहान प्रिटोरियस आणि रुबिन हरमन यांनी दमदार फलंदाजी केली. प्रिटोरियसने ४३ धावा केल्या तर हरमनने ५१ चेंडूत ५९ धावा केल्या.
यांंतर दिनेश कार्तिकने १४० च्या स्ट्राइक रेटने खेळताना १५ चेंडूत २१ धावा केल्या, जी त्याची या लीगमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. कार्तिकच्या खेळीत २ षटकारांचा समावेश होता. SA20 मध्ये कार्तिकने दुसऱ्यांदा दुहेरी अंकी धावसंख्या गाठली. याआधी त्याची सर्वोत्तम धावसंख्या १० धावा होती.
दिनेश कार्तिकने SA 20 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ८ सामन्यांच्या ५ डावात ४४ धावा केल्या आहेत. त्यानेया स्पर्धेत आतापर्यंत ३ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.
संबंधित बातम्या