Olympics News: क्रिकेट खेळाला अधिकृतपणे ऑलिम्पिकचा भाग बनवण्यात आले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मान्यतेनुसार, लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल १२८ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. मात्र, या स्पर्धेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जाडेजा आणि सूर्यकुमार यांसारख्या खेळाडूंचे खेळणे कठीण आहे.
वाढत्या वयामुळे अनेक स्टार भारतीय क्रिकेटपटू लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचा भाग बनू शकणार नाहीत. कारण, तो पर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला असेल किंवा निवृत्तीच्या अगदी जवळ असेल. यामुळे अनेक भारतीय खेळाडूंचे लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या ३६ वर्षांचा आहे. ऑलिम्पिकपर्यंत त्याचे वय ४१ असेल. अशा स्थितीत त्याचे ऑलिम्पिक खेळणे अवघड आहे. तर, विराट कोहली ३४ वर्षांचा आहे. त्याचेही ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची शक्यता फार कमी आहे. याशिवाय, रवींद्र जाडेजा हा ३४ आणि सूर्यकुमार यादव आणि सूर्यकुमार यादव ३३ वर्षांचा आहे.
हित शर्मा- ४१ वर्षे
विराट कोहली- ३८ वर्षे
सूर्यकुमार यादव- ३७ वर्षे
शुभमन गिल- २८ वर्षे
जसप्रीत बुमराह- ३३ वर्षे
हार्दिक पांड्या- ३४ वर्षे
कुलदीप यादव- ३२ वर्षे
मोहम्मद सिराज- ३३ वर्षे
टिळक वर्मा- २४ वर्षे
ऋषभ पंत - ३० वर्षे
रवींद्र जडेजा- ३८ वर्षे.