एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातला हुशार कर्णधार कोण? अश्विननं सांगितली तिघांची खासियत-difference between captains virat kohli rohit sharma and ms dhoni r ashwin hits bullseye ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातला हुशार कर्णधार कोण? अश्विननं सांगितली तिघांची खासियत

एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातला हुशार कर्णधार कोण? अश्विननं सांगितली तिघांची खासियत

Sep 07, 2024 01:25 PM IST

R Ashwin: एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील नेतृत्वात कोणता फरक आहे, याबाबत आर अश्विनने सांगितले आहे.

अश्विननं सांगितली भारतीय कर्णधारांची खासियत
अश्विननं सांगितली भारतीय कर्णधारांची खासियत

MS Dhoni vs Rohit Sharma vs Virat Kohli: टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने नुकताच एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कर्णधारपदाची खासियत सांगितली आहे. २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या फिरकीपटूने या तिन्ही कर्णधारांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर क्रिकेट खेळले आहे. या तिन्ही कर्णधाराकडून त्याला खूप काही शिकायला मिळाले. परंतु, या तिघांमध्ये सर्वात हुशार कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना अश्निन काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊयात.

क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला की, 'मला धोनीच्या कर्णधारपदातील एक गोष्ट आवडली, त्याच्याकडून खेळाडूला मिळणारी संधी. त्याचा नव्या खेळाडूंना अधिक सामन्यात खेळवण्याचा प्रयत्न असतो. रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैनाकडे पाहिले तर धोनीने जाडेजाला फिनिशरच्या भूमिकेत खूप चांगले घडवले. रवींद्र जाडेजा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. धोनीने त्याच्यातील क्षमता ओळखून त्याला संधी दिली. त्याचा फायदा भारतीय संघालाही झाला.धोनीची ही गोष्ट मला खूप आवडते. पण लोक म्हणतात की, तो गप्प राहतो. माझा विश्वास बसत नाही. खरं सांगायचे झाले तर फक्त शांत दिसतो.'

कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल अश्विन म्हणाला की, ‘विराटबद्दल तो प्रेरणादायी आहे. आपण अनेकदा पाहिले आहे की, विराट कोहलीने अनेकदा संकटाच्या काळात एकट्याच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. तो साध्य करून आदर्श घालून देतो. संघाला त्याच्याकडून काय अपेक्षित आहे, ते तो स्वत: करतो.’

रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत बोलताना अश्विन म्हणाला की,' कोहली आणि धोनी टेक्नीकली मजबूत आहेत. पण रोहित शर्मा त्यांच्यापेक्षा जास्त हुशार असल्याचे त्याचे मत आहे. रोहित शर्मामध्ये दोन- तीन गोष्टी खूप चांगल्या आहेत. तो नेहमी संघातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो. धोनी- विरोट कोहली देखील असेच होते. पण, रोहितची रणनीती त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. एखादा मोठा सामना किंवा मालिका असेल तर तो प्रशिक्षकांसोबत खेळाडूंशी चर्चा करतो. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कोणत्या चुका सुधारल्या पाहिजेत, हे सांगण्याचा त्याचा प्रयत्न असतो. हीच त्याची ताकद आहे. तो आपल्या खेळाडूला १०० टक्के पाठिंबा देतो.'

Whats_app_banner