Gautam Gambhir-Shah Rukh Khan, Team India Head Coach : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सध्या चर्चेत आहे. सध्या राहुल द्रविड प्रशिक्षकाची भूमिका निभावत आहे, परंतु द्रविडचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ नंतर संपणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया आणि बीसीसीआय नव्या हेड कोचच्या शोधात आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरकडे पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून पाहिले जात आहे. पण शाहरुख खान गंभीरला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यापासून रोखत आहे का? अशी चर्चा रंगली आहे. पण याबाबत नेमकं सत्य काय? जाणून घेऊया.
या वर्षापासून म्हणजेच IPL २०२४ पासून गंभीर कोलकाताचा मार्गदर्शक बनला आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली संघाने स्पर्धेची अंतिम फेरीही गाठली. अशा परिस्थितीत केकेआरला गंभीरला अजिबात सोडायचे नाही आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी त्याला इतर संघांना सोडावे लागेल.
दरम्यान, गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अद्याप अर्ज केलेला नाही. गंभीरने या पदासाठी अर्ज न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा KKR सह सध्याचा कार्यकाळ. कोलकाताने गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता त्याच्या मार्गदर्शनाखाली संघ चॅम्पियन होण्याच्या अगदी जवळ आहे.
गौतम गंभीर आणि कोलकाताचा सहमालक शाहरुख खान यांच्यात खूप चांगले संबंध आहेत. शाहरुख खानला गंभीरने केकेआरपासून वेगळे व्हावे असे अजिबात वाटत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीर जेव्हा लखनऊ सुपर जायंट्ससोबत मेंटर म्हणून काम करत होता, तेव्हा शाहरुख खानने त्याला केकेआरमध्ये परत येण्याची विनंती केली होती.
आता गंभीरचे मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत एका सूत्राने 'दैनिक जागरण'ला सांगितले की, "गौतम गंभीरने याबाबत कोलकाता मालक शाहरुख खानशी अद्याप चर्चा केलेली नाही. जर त्याने या पदासाठी अर्ज केला तर तो अर्थातच शाहरुख खानशी बोलेल. कारण केकेआर गंभीर १० वर्षांपर्यंत फ्रँचायझीशी जोडून ठेवणार असल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या