IPL Auction 2025 : आयपीएल २०२५ साठी लवकरच खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. पण त्याआधी सर्वच संघांना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची जाहीर करायची आहे. या महिन्याच्या शेवटी ही यादी सर्वांसमोर येईल. अशातच आता गुजरात टायटन्स संघाबात एक बातमी समोर आली आहे.
गुजरात टायटन्सने त्यांच्या रिेटेन होणाऱ्या खेळाडूंची नावे ठरवली आहेत, असा दावा केला जात आहे. या संघात शुभमन गिल, राशिद खान, मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा आणि साई सुदर्शन अशी मोठी आहेत. आता यातून कोण रिटेन होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अशा स्थितीत गुजरात टायटन्ससाठी रिटेनशन सोपे होणार नाही, पण आता गुजरात टायटन्सच्या सोशल मीडिया पोस्टनंतर रिटेनशनचे मोठे संकेत मिळत आहेत. गुजरात टायटन्सच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे की गुजरात टायटन्सचे संभाव्य रिटेन खेळाडू कोण असणार?
गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या सोशल मीडिया पोस्टमध्ये शुभमन गिल आणि राशिद खान दिसत आहेत. या पोस्टनंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, गुजरात टायटन्सचे रिटेन खेळाडू कोण असतील हे आता ठरले आहे. गुजरात टायटन्स शुभमन गिल आणि राशिद खानला संघात कायम ठेवणार आहे.
तथापि, अनेक मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की शुभमन गिल आयपीएल लिलावाचा भाग असेल, याचा अर्थ गुजरात टायटन्स त्याला सोडत आहे. तर रशीद खान गुजरात टायटन्सचा पहिला रिटेन्शन असेल.
गुजरात टायटन्स प्रथमच आयपीएल २०२२ हंगामात खेळला होता. गुजरात टायटन्सने पहिल्याच सीझनमध्ये विजेतेपद पटकावून सर्वांनाच चकित केले होते. यानंतर गुजरात टायटन्सने आयपीएल २०२३ च्या मोसमात अंतिम फेरी गाठली, पण त्यांना विजेतेपद मिळवण्यात अपयश आले.
अशा प्रकारे गुजरात टायटन्सने सलग दोनदा अंतिम फेरी गाठली. हार्दिक पांड्या या दोन्ही वेळा गुजरात टायटन्सचा कर्णधार होता, पण आता आता हार्दिक पांड्या त्याच्या जुन्या टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला आहे. आयपीएल २०२४ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रेड केले होते. त्याचबरोबर आता हार्दिक पंड्याच्या जागी शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे.
संबंधित बातम्या