IPL 2025 : लखपतीचे करोडपती झाले हे ८ खेळाडू, २० लाखांच्या ध्रुव जुरेलला मिळाले १४ कोटी रूपये, पाहा यादी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 : लखपतीचे करोडपती झाले हे ८ खेळाडू, २० लाखांच्या ध्रुव जुरेलला मिळाले १४ कोटी रूपये, पाहा यादी

IPL 2025 : लखपतीचे करोडपती झाले हे ८ खेळाडू, २० लाखांच्या ध्रुव जुरेलला मिळाले १४ कोटी रूपये, पाहा यादी

Published Nov 01, 2024 02:39 PM IST

Ipl 2025 Retention : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने प्रत्येकी सर्वाधिक ६ खेळाडू रिटेन केले आहेत. तर पंजाब किंग्जने केवळ २ खेळाडूंना सोबत ठेवले आहे.

IPL 2025 : लखपतीचे करोडपती झाले हे ८ खेळाडू, २० लाखांच्या ध्रुव जुरेलला मिळाले १४ कोटी रूपये, पाहा यादी
IPL 2025 : लखपतीचे करोडपती झाले हे ८ खेळाडू, २० लाखांच्या ध्रुव जुरेलला मिळाले १४ कोटी रूपये, पाहा यादी

आयपीएल २०२५ पूर्वी सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यावेळी मेगा लिलाव होणार आहेत आणि या कारणास्तव फ्रँचायझी जास्तीत जास्त ६ खेळाडू राखून ठेवू शकेल. आयपीएलच्या सर्व १० संघांनी एकूण ४६ खेळाडूंना कायम ठेवले आहे. 

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने प्रत्येकी सर्वाधिक ६ खेळाडू रिटेन केले आहेत. तर पंजाब किंग्जने केवळ २ खेळाडूंना सोबत ठेवले आहे.

हे लखपती खेळाडू करोडपती झाले

आयपीएलमध्ये रिटेन झालेल्या खेळाडूंमध्ये अनेक नावे आहेत, जे यापूर्वीच्या लिलावात अगदी कमी किंमतीत विकले गेले होते. राजस्थान रॉयल्सच्या ध्रुव जुरेल याला सर्वात मोठा फायदा झाला आहे. २०२२ च्या लिलावात, यूपीचा यष्टीरक्षक फलंदाज जुरेलला राजस्थान रॉयल्सने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. पण आता जुरेलला १४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. म्हणजे त्याचा पगार ७० पट वाढला आहे. 

याच वर्षी ज्युरेलने भारताकडून कसोटी पदार्पण केले. तो T20 आंतरराष्ट्रीय देखील खेळला आहे आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग आहे.

या खेळाडूंनाही छप्परफाड पैसे मिळाले

लखपतीतून करोडपती बनण्याच्या यादीत ध्रुव जुरेल एकटाच नाही. मयंक यादव आणि रजत पाटीदार यांनी याआधीचे सीझन प्रत्येकी २० लाख रुपयांमध्ये खेळला. आता फ्रँचायझी या दोघांना आयपीएल २०२४ मध्ये खेळण्यासाठी ११-११ कोटी रुपये देईल. मयंकने आयपीएलमध्ये आपल्या वेगानं सर्वांना आश्चर्यचकित केलं. पाटीदार हा मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आहे. रिंकू सिंगचा पगारही ५५ लाखांवरून १३ कोटींवर पोहोचला आहे. त्याची वाढ २२०० टक्क्यांहून अधिक झाली आहे.

ध्रुव जुरेल- राजस्थान (२० लाख)- १४ कोटी

मयंक यादव- लखनौ (२० लाख) ११ कोटी

रजत पाटीदार- बंगळुरू (२० लाख) ११ कोटी

रिंकू सिंग- कोलकाता (५५ लाख) १३ कोटी

ट्रिस्टन स्टब्स- दिल्ली (५० लाख) १० कोटी

साई सुदर्शन- गुजरात (२० लाख) ८.५ कोटी

नितीश रेड्डी- हैदराबाद (२० लाख) ६ कोटी

शशांक सिंग- पंजाब (२० लाख) ५.५ कोटी

परदेशी खेळाडूंचही नशीब चमकलं

यात केवळ भारतीय खेळाडूच नशीबवान आहेत असे नाही. गेल्या वर्षीच्या लिलावात दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सला दिल्ली कॅपिटल्सने केवळ ५० लाख रुपयांना विकत घेतले होते. आता त्याला १० कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्ससाठी फ्लॉप ठरलेल्या स्टब्सने गेल्या मोसमात दिल्लीसाठी ५४ च्या सरासरीने आणि १९२ च्या स्ट्राईक रेटने ३७८ धावा केल्या. त्याच्याकडे मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके खेळण्याची क्षमता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या