मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG 3rd Test : केएस भरतला डच्चू मिळणार, ध्रुव जुरेल राजकोट कसोटीत खेळणार

IND vs ENG 3rd Test : केएस भरतला डच्चू मिळणार, ध्रुव जुरेल राजकोट कसोटीत खेळणार

Feb 12, 2024 12:13 PM IST

IND vs ENG 3rd Rajkot Test : तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणार आहे. पण त्याआधी उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.

IND vs ENG 3rd Rajkot Test
IND vs ENG 3rd Rajkot Test (PTI)

IND vs ENG 3rd Rajkot Test : सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने झाले आहे. त्यात पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली तर दुसऱ्या कसोटीत भारताने बाजी मारली. म्हणजेच मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. 

आता तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणार आहे. पण त्याआधी उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.

पण, भारतीय चाहत्यांना तिसऱ्या कसोटीत खेळणाऱ्या प्लेइंग इलेव्हनची जास्त उत्सुकता आहे. तिसऱ्या कसोटीतून विकेटकीपर फलंदाज केएस भरत याला वगळले जाऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

भरतने आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळले आहेत. यात तो विशेष काही करू शकलेला नाही. त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. भरतची संघात पुन्हा निवड करण्यात आली आहे. पण, आता त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येणार हे निश्चित दिसत आहे. त्याच्या जागी यूपीच्या ध्रुव जुरेलला स्थान मिळणार आहे.

ध्रुव जुरेल राजकोट कसोटीत पदार्पण करू शकतो

सुत्रांच्या माहितीनुसार, केएस भरतला आता संघातून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी युवा ध्रुव जुरेलला संधी दिली जाऊ शकते. भरतची फलंदाजी खूपच खराब झाली आहे. त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही.

दुसरीकडे, जुरेल प्रतिभावान आहे आणि त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. त्याने उत्तर प्रदेश, भारत अ आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे.

२३ वर्षीय ध्रुव जुरेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये १७२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत १५२ धावा केल्या आहेत.

जुरेलने १५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४६ च्या सरासरीने ७९० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून १ शतक आणि ५ अर्धशतकेही झळकली आहेत. 

WhatsApp channel