भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे. वास्तविक, भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप ट्रॉफी २०२४ चे सामने खेळवले जात आहेत.
यावेळी ही स्पर्धा खूपच खास आहे, कारण टीम इंडियाचे जवळपास सर्वच स्टार खेळाडू सध्या या स्पर्धेत खेळत आहेत. या स्पर्धेत खेळाडू चांगली कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे निवडकर्त्यांना नवीन प्रतिभा शोधण्यासही मदत होईल.
दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये, ध्रुव ज्युरेलने भारत अ संघाकडून खेळताना आपली विकेटकीपिंग कौशल्य दाखवले आणि भारत ब विरुद्ध एका डावात ७ झेल घेतले.
जुरेलने धोनीच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली
धोनीने २००४ साली इस्ट झोनकडून खेळताना सेंट्रल झोनविरुद्ध एका डावात ७ झेल घेतले होते. आता ध्रुव जुरेलने धोनीच्या याच विक्रमाची बरोबरी केली.
ध्रुव जुरेल आणि एमएस धोनीच्या आधी, सुनील बेंजामिन यांच्या नावावर हा विक्रम होता, त्यांनी १९७३ च्या फायनलमध्ये सेंट्रल झोनकडून खेळताना नॉर्थ झोनविरुद्ध ६ झेल आणि १ स्टंपिंग केली होती.
२२ वर्षीय जुरेलने भारत अ संघाच्या यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, मुशीर खान, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, साई किशोर आणि नवदीप सैनी यांना बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यष्टिरक्षक म्हणून ध्रुव जुरेलने भारत अ संघासाठी चमकदार कामगिरी केली. ध्रुव पहिल्या डावात ६ चेंडू खेळून ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर जुरेलला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. त्याने फलंदाजीत निराशा केली पण विकेटकीपिंगमध्ये तुफानी कामगिरी केली.
Duleep Trophy: Most Catches by a Wicket-keeper in an Innings | |||
Name | Catches | Team | Season |
MS Dhoni | 7 | East Zone | 2004-05 |
Dhruv Jurel | 7 | India A | 2024-25 |
Sunil Benjamin | 6 | Central Zone | 1973-74 |
Sadanand Viswanath | 6 | South Zone | 1980-81 |
१) एमएस धोनी- ७ झेल- २००४-०५
२) ध्रुव जुरेल- ७ झेल- २०२४
३) सुनील बेंजामिन - ६ झेल - १९७३-७४
४) सदानंद विश्वनाथ- ६ झेल- १९८०-८१