Dhanashree Verma Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार दोघेही घटस्फोट घेऊ शकतात. धनश्री आणि चहलचे संबंध बरेच दिवसांपासून चांगले नसल्याचा दावा केला जात आहे.
चहलने इन्स्टाग्रामवरून धनश्रीसोबतचे सर्व फोटोही हटवले आहेत. दरम्यान या दोघांचा घटस्फोट झाला तर मालमत्तेची विभागणी कशी होईल आणि धनश्रीला किती हिस्सा मिळेल, याबाबतचे नियम काय आहेत, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
वास्तविक, अलीकडेच धनश्री आणि युझी चहल यांच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. दोघांचा घटस्फोट होत असल्याचा दावा केला जात आहे. चहल क्रिकेटमधून भरपूर पैसा कमावतो. यासोबतच ते जाहिरातींमधूनही कमाई करतो. धनश्री एक प्रोफेशन डान्सर आहे. ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. धनश्रीलाही चांगले उत्पन्न मिळते. आता दोघांमध्ये घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.
वास्तविक, घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये सर्व काही न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असते. चहल आणि धनश्री या दोघांची आर्थिक स्थिती चांगली आहे. घटस्फोट झाला तरी धनश्रीला पतीच्या मालमत्तेत वाटा हवा की नाही? यावर हे अवलंबून असेल. तिला हवे असल्यास ती याबाबत न्यायालयात जाऊ शकते. मात्र, हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या बाबतीत पैशांचा मुद्दा पुढे आला नाही.
युझवेंद्र चहलने अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून धनश्रीसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले आहे. पण धनश्रीने तिच्या प्रोफाईलवरून फोटो हटवलेले नाहीत. अशात घटस्फोटाच्या बातम्या आल्या. मात्र, या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.