Yuzvendra Chahal Spotted With Mystery Girl : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या अफवांचे सत्य अद्याप समोर आलेले नाही, परंतु अलीकडेच युझवेंद्र चहल एका 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला, ज्यामुळे या अफवांना आणखी बळ मिळाले आहे.
या व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आले असून युझीसोबतच दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण आहे, याबद्दल नेटकऱ्यांना उत्सुकता आहे.
युझवेंद्र चहल आणि एका मिस्ट्री गर्लचा मुंबईतील एका हॉटेलमधील फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये युझीने कॅज्युअल ड्रेस घातला होता आणि मिस्ट्री गर्लने हिरव्या रंगाचा स्वेटशर्ट घातला होता. युझवेंद्र आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यामागे ही मुलगी कारणीभूत आहे का, असा प्रश्न या फोटोवरून चाहत्यांना पडला आहे.
मात्र, एका सोशल मीडिया युझरने ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, हे सांगितले आहे. त्यानुसार युझीसोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून आरजे महवेश आहे. या युझरने महवाशच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे सिद्ध केले की ती आणि युझवेंद्र चहल मित्र आहेत आणि त्यांनी नुकतेच एकत्र ख्रिसमस लंच केले.
दरम्यान घटस्फोटाच्या अफवांवरून धनश्री वर्माने मौन सोडले आहे. तिने इंस्टाग्रामवर एक लांब पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने घटस्फोटाच्या अफवांचे खंडन केले. धनश्रीने लिहिले की, “माझ्याबद्दल विविध गोष्टी लिहिल्या जात आहेत आणि माझी इमेत खराब केली जात आहे.
माझे नाव आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले आहेत आणि माझे मौन हे कमकुवतपणाचे नाही तर ताकदीचे लक्षण आहे.”
धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे, "ऑनलाइन द्वेष पसरवणे सोपे आहे, परंतु इतरांना उन्नत करण्यासाठी धैर्य आणि सहनशीलता लागते. मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रित करते आणि माझ्या मूल्यांना धरून पुढे जाते. कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय सत्य स्वतःला सिद्ध करते."
संबंधित बातम्या