IPL 2024 : सीएसकेला सर्वात मोठा धक्का, धोनीचा भरवशाचा सलामीवीर आयपीएलमधून बाहेर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : सीएसकेला सर्वात मोठा धक्का, धोनीचा भरवशाचा सलामीवीर आयपीएलमधून बाहेर

IPL 2024 : सीएसकेला सर्वात मोठा धक्का, धोनीचा भरवशाचा सलामीवीर आयपीएलमधून बाहेर

Mar 04, 2024 11:08 AM IST

Devon Conway Injury : आयपीएल २०२४ मध्ये चेन्नईचा पहिला सामना २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा यंदाच्या आयपीएलचा उद्घाटनाचा सामना असेल.

Devon Conway IPL 2024
Devon Conway IPL 2024

Devon Conway IPL 2024 : आगामी आयपीएलपूर्वी म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या मोसमापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर डेव्हन कॉनवे याला दुखापत झाली आहे. त्यामुळे कॉनवे आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे.

आयपीएल २०२४ मध्ये चेन्नईचा पहिला सामना २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा यंदाच्या आयपीएलचा उद्घाटनाचा सामना असेल. 

दरम्यान, सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. त्याआधी दोन्ही संघात टी-20 मालिका खेळली गेली. मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे याला दुखापत झाली. यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला.

कॉनवेच्या अंगठ्याला फ्रॅक्चर

पण आता ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, आता तो दुसऱ्या टेस्ट मॅचमधूनही बाहेर आहे. कॉनवेच्या अंगठ्याला फ्रॅक्चर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला दुखापत झाली होती. 

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले की, कॉनवे याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे तो ८ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. यामुळे मेपर्यंत कॉनवे क्रिकेट खेळू शकणार नाही.

कॉनवे धोनीचा भरवशाचा फलंदाज

आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने डेव्हॉन कॉनवेला १ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने CSK ला अनेक सामने स्वबळावर जिंकवले आहेत. कॉनवेने आयपीएल २०२२ च्या ७ सामन्यात २५२ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने आयपीएल २०२३ च्या १६ सामन्यांमध्ये ६७२ धावा केल्या. आयपीएल २०२३ मध्ये, त्याने CSK ला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सीएसकेने पाच वेळा विजेतेपद पटकावले 

चेन्नई सुपर किंग्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. गेल्या मोसमात सीएसकेने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला होता. चेन्नईकडे धोनीसारखा दिग्गज कर्णधार आहे. तसेच, रवींद्र जडेजा आणि मोईन अलीसारखे स्टार अष्टपैलू खेळाडू आहेत.

Whats_app_banner