IPL 2024 : धोनीच्या सीएसकेला तगडा झटका, ५०० धावा ठोकणाऱ्या फलंदाजाला गंभीर दुखापत-devon conway injured trouble for csk ahead of ipl 2024 devon conway injury update chennai super kings ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : धोनीच्या सीएसकेला तगडा झटका, ५०० धावा ठोकणाऱ्या फलंदाजाला गंभीर दुखापत

IPL 2024 : धोनीच्या सीएसकेला तगडा झटका, ५०० धावा ठोकणाऱ्या फलंदाजाला गंभीर दुखापत

Feb 28, 2024 05:36 PM IST

Devon Conway IPL 2024 : कॉनवे दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान कॉनवेला दुखापत झाली होती. आता त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे.

Devon Conway IPL 2024
Devon Conway IPL 2024

 devon conway injury update ipl 2024 : आगामी आयपीएलपूर्वी म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या मोसमापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर डेव्हन कॉनवे याला दुखापत झाली आहे. त्यामुळे कॉनवे आयपीएल २०२४ मध्ये खेळेल याची खात्री नाही. 

कॉनवे दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान कॉनवेला दुखापत झाली होती. आता त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे. कॉनवेला पुन्हा मैदानात परतायला किती वेळ लागेल? हे अद्याप समजू शकलेले नाही.

न्यूझीलंड क्रिकेट संघानेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कॉनवेच्या बदलीची घोषणा केली आहे. बदली म्हणून हेन्री निकोल्सला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, निकोल्स प्लेइंग ११ मध्ये खेळणार हे निश्चित नाही. 

विल यंग पहिल्या कसोटीत सलामीला खेळताना दिसणार आहे. पण कॉनवेच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत, हे नक्की. कॉनवेच्या फिटनेसबाबतचे  रिपोर्ट समोर आल्यानंतरच तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळेल की नाही? हे स्पष्ट होईल.

CSK साठी अडचणी वाढल्या

कॉनवेच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यूझीलंडचे प्रशिक्षक म्हणाले की, ‘महत्त्वाच्या सामन्यापूर्वी डेव्हॉन कॉनवेची दुखापत हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. कॉनवे हा क्लास खेळाडू आहे. टॉप ऑर्डरमध्ये आम्ही कॉनवेला मिस करणार आहोत. या मालिकेपूर्वी कॉनवे चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. 

गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवण्यात कॉनवेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॉनवेने गेल्या मोसमात ५०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळेच CSK ने विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले. आता सीएसकेचे लक्ष सहावे विजेतेपद मिळविण्यावर आहे. चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना २२ मार्चला आरसीबीविरुद्ध खेळायचा आहे.

Whats_app_banner