मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Test : धर्मशाला कसोटीत भारताची प्रथम गोलंदाजी, देवदत्त पडिक्कलचे पदार्पण, पाहा प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG Test : धर्मशाला कसोटीत भारताची प्रथम गोलंदाजी, देवदत्त पडिक्कलचे पदार्पण, पाहा प्लेइंग इलेव्हन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 07, 2024 09:18 AM IST

Devdutt Padikkal Debut : टीम इंडिया सध्या मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

Devdutt Padikkal Debut
Devdutt Padikkal Debut (PTI)

India Vs England 5th Test Dharamsala : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून (७ मार्च) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने देवदत्त पडिक्कलला पदार्पणाची संधी दिली आहे.

देवदत्त पड्डीकल याला रविचंद्रन अश्विनने पदार्पणाची कॅप दिली. विशेष म्हणजे आज आर अश्विन त्याचा १०० कसोटी सामना खेळणार आहे.

यापूर्वी रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत वेगवान गोलंदाज आकाश दीपने भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. आता देवदत्त पडिक्कललाही पदार्पणाची संधी मिळाली आहे. पडिक्कलने याआधीच भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड : जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), शोएब बशीर, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.

भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

डाव्या हाताचा फलंदाज पड्डीकलने यापूर्वीच जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 सामन्यातून भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला आतापर्यंत केवळ दोनच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. 

रजत पाटीदारच्या जागी देवदत्तला पदार्पणाची संधी मिळाली. धर्मशाला कसोटीपूर्वी पाटीदार जखमी झाला होता.

इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून अनेक खेळाडूंनी पदार्पण केले. सर्वप्रथम रजत पाटीदारने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताकडून कसोटी पदार्पण केले. यानंतर सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी राजकोट कसोटीत पदार्पण केले. यानंतर वेगवान गोलंदाज आकाशदीपने रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत पदार्पण केले.

देवदत्त पडिक्कलची प्रथम श्रेणीतील कारकीर्द

मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या देवदत्त पडिक्कलने आतापर्यंत ५८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९९ डावांमध्ये फलंदाजी करताना ४३.६८च्या सरासरीने ४०६३ धावा केल्या आहेत. यात, त्याने १२ शतके आणि २२ अर्धशतके केली आहेत, त्याची सर्वोच्च धावसंख्या १९६ धावा आहे.

IPL_Entry_Point