Delhi vs Railways Live Streaming : विराट कोहलीचे १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार आहे. विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या होम टीम दिल्लीकडून खेळणार आहे. यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने (DDCA) विशेष तयारी केली आहे. विराटचा रणजी सामना पाहण्यासाठी DDCA १० हजार प्रेक्षकांना फ्रीमध्ये एन्ट्री देणार आहे.
विराटच्या रणजी कमबॅक सामन्यासाठी जिओ सिनेमानेही मोठा निर्णय घेतला आहे. जिओ सिनेमा कोहलीच्या चाहत्यांना एक खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे आणि दिल्ली यांच्यातील रणजी सामना आधी लाईव्ह दाखवायचा नव्हता. डीडीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'बीसीसीआयने आधीच तीन सामने प्रसारित करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कर्नाटक विरुद्ध हरियाणा, बंगाल विरुद्ध पंजाब, आणि जम्मू-काश्मीर विरुद्ध बडोदा या सामन्यांचा समावेश होता.
पण आता कोहलीची ही क्रेझ लक्षात घेऊन जियो सिनेमाने मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना जिओ सिनेमावर विराट कोहलीच्या फलंदाजीचा आनंद घेता येणार आहे. आधी दिल्लीचा सामना लाईव्ह प्रसारित होणार नव्हता.
दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील सामना ३० जानेवारीपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात कोहलीच्या उपस्थितीमुळे १० हजार चाहत्यांना कोहलीच्या फलंदाजीचा आनंद घेण्यासाठी डीडीसीएने तयारी केली आहे.
डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली म्हणाले की, नॉर्थ एंड आणि ओल्ड क्लब हाऊसमध्ये १० हजार चाहत्यांसाठी बसण्याची व्यवस्था केली जाईल. आवश्यक असल्यास, उर्वरित स्टँडच्या तळमजल्यावरही चाहत्यांना प्रवेश दिला जाईल.
संबंधित बातम्या