मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs CSK Highlights : धोनी फलंदाजीला आला पण सीएसकेचा पराभव टाळू शकला नाही, दिल्लीचा पहिला विजय

DC vs CSK Highlights : धोनी फलंदाजीला आला पण सीएसकेचा पराभव टाळू शकला नाही, दिल्लीचा पहिला विजय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 31, 2024 11:26 PM IST

DC vs CSK Match Scorecard : आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली आणि चेन्नई आमनेसामने होते. या सामन्यात दिल्लीने २० धावांनी विजय मिळवला.

Delhi Capitals Vs Chennai Super Kings Match Scorecard
Delhi Capitals Vs Chennai Super Kings Match Scorecard (AP)

DC vs CSK Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ मध्ये आज (३१ मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. विशाखापट्टण येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीने २० धावांनी विजय मिळवला.

दिल्लीचा या मोसमातील हा पहिला विजय आहे. तर चेन्नईचा हा पहिला पराभव आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने १६ चेंडूंचा सामना करत ३७ धावांची तुफानी खेळी केली.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ३ षटकार आले. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. दिल्लीचा या मोसमातील हा पहिला विजय आहे. तर चेन्नईचा हा पहिला पराभव आहे.

 दिल्लीने सीएसकेला विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य दिले होते, याच्या प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ ६ गडी गमावून केवळ १७१ धावाच करू शकला आणि सामना गमावला.

संघाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४५ धावांची आणि डॅरेल मिशेलने ३४ धावांची खेळी खेळली. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या मोसमात पहिल्यांदा फलंदाजीला आला, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

धोनीने या सामन्यात आपले कौशल्य नक्कीच दाखवले आणि ३ षटकार मारले. मात्र १६ चेंडूत ३७ धावा करून तो नाबाद राहिला. दिल्ली संघाकडून मुकेश कुमारने ३ बळी घेतले. तर खलील अहमदने २ आणि अक्षर पटेलने १ बळी घेतला.

दिल्लीचा डाव

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सकडून डेव्हिड वॉर्नरने ३५ चेंडूत ५२ धावांची तर कर्णधार ऋषभ पंतने ३२ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. कार अपघातानंतर ऋषभ पंतचे हे पहिलेच अर्धशतक आहे.

या व्यतिरिक्त या मोसमात पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉने ४३ धावांची खेळी खेळली. दुसरीकडे, चेन्नई संघाकडून वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने ३ बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.

IPL_Entry_Point