आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचे मेगा ऑक्शन पार पडले. यानंतर आता सर्वच संघ आगामी आयपीएल सीझनसाठी सज्ज झाले आहेत. आगामी हंगामासाठी जेद्दाह येथे एक मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रत्येक संघाने त्यांच्या आवडीचे आणि गरजेचे खेळाडू विकत घेतले.
लिलाव झाल्यापासून, प्रत्येकजण रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सबद्दल बोलत आहे, परंतु दिल्ली कॅपिटल्सबद्दल फारसे बोलले जात नाही. पण जर तुम्ही या संघाकडे पाहिले तर तुम्हाला समजेल की त्यांच्याकडे एक, दोन किंवा तीन नाही, तर निम्म्याहून अधिक खेळाडू हे मॅच विनर आहेत.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात, दिल्ली कॅपिटल्सने फाफ डू प्लेसिस, दुष्मंथा चमीर, डोनावन फेरेरिया, मोहित शर्मा, समीर रिझवी आणि करुण नायर यांसारख्या अनेक शक्तिशाली खेळाडूंना खरेदी केले आहे.
पण या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे. आता विचार करा, जेव्हा असे भयंकर खेळाडू बेंचवर बसणार असतील, तेव्हा त्यांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
आयपीएल २०२५ साठी दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियाचा युवा प्रतिभा जॅक फ्रेझर मॅकगर्क डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत केएल राहुल ओपनिंग करेल. राहुलकडे संघाची कमानही येऊ शकते. यानंतर अभिषेक पोरेल तिसऱ्या क्रमांकावर दिसू शकतो.
इंग्लंडचा शक्तिशाली फलंदाज हॅरी ब्रूक चौथ्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिकेचा ट्रस्टन स्टब्स पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. यानंतर आशुतोष शर्मा सहाव्या क्रमांकावर तर अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर खेळेल अशी अपेक्षा आहे.
मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुकेश कुमार गोलंदाजी विभाग सांभाळू शकतात. बाकी अक्षर पटेल हा पाचवा गोलंदाज असेल. तर इम्पॅक्ट प्लेयर एक गोलंदाज असू शकतो, जो मोहित शर्मा असू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- जॅक फ्रेझर मॅकगर्क, केएल राहुल, अभिषेक पोरेल, हॅरी ब्रूक, ट्रस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुकेश कुमार.