MIW vs DCW Run Out Controversy : महिला प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (१५ फेब्रुवारी) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ आमनेसामने होते. या थरारक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला. मात्र हा सामना चांगलाच वादात सापडला आहे.
वास्तविक, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स मॅचमध्ये थर्ड अंपायरच्या रन आऊटच्या तीन निर्णयांनी चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
याशिवाय थर्ड अंपायरच्या निर्णयावर क्रिकेट तज्ज्ञही प्रश्न उपस्थित करत आहेत. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी शेवटच्या १५ चेंडूत २५ धावा करायच्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सकडून शिखा पांडे आणि निक्की प्रसाद क्रीजवर होते.
शिखा पांडेने १८व्या षटकात शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत उसळला. यानंतर शिखा पांडे आणि निक्की प्रसादने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण स्ट्रायकरच्या टोकाला डायरेक्ट हीट बसला. शिखा पांडे त्या एंडकडे धावत होती.
तथापि, शिखा पांडेला तिसऱ्या पंचाने नाबाद घोषित केले, परंतु रिप्लेमध्ये असे स्पष्टपणे दिसून आले की जेव्हा चेंडू आदळल्यानंतर स्टंपचा एलईडी लाइट लागला तेव्हा शिखा पांडे क्रीजच्या बाहेर होती, परंतु असे असतानाही पंचांनी तिला नाबाद घोषित केले.
तसेच या घटनेनंतर काही वेळाने पुन्हा अशीच घटना पाहायला मिळाली, राधा यादव फलंदाजी करत असताना या वेळीही तिसऱ्या पंचाने आपल्या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
मात्र, या वादांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय संपादन केला, पण शेवटच्या चेंडूवरही रनआऊटचा वाद झाला. किंबहुना, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करत असताना दिल्ली कॅपिटल्सची फलंदाज जवळपास आऊट झाली होती.
पण यावेळीही हे प्रकरण अगदी क्लोज होते. असे वाटत होते की फलंदाज त्याच्या क्रीजच्या बाहेर आहे, परंतु तिसऱ्या पंचाने तिला नाबाद घोषित केले. मात्र, सोशल मीडियावर दिल्ली कॅपिटल्सच्या विजयापेक्षा धावबादच्या वादावरच अधिक चर्चा होत आहे. सोशल मीडिया युजर्स आणि क्रिकेट तज्ञ सोशल मीडियावर अंपायरच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
संबंधित बातम्या