मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GT Vs DC Highlights : नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्लीच्या गोलंदाजांचा धुमाकूळ, गुजरातचा अवघ्या ८.९ षटकात पराभव

GT Vs DC Highlights : नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्लीच्या गोलंदाजांचा धुमाकूळ, गुजरातचा अवघ्या ८.९ षटकात पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 17, 2024 10:53 PM IST

IPL 2024, GT Vs DC Match Highlights : आयपीएल २०२४ मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना झाला. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात दिल्लीने गोलंदाजांच्या जोरावर सहज विजयाची नोंद केली. या मोसमातील हा संघाचा तिसरा विजय आहे.

Gujarat Titans Vs Delhi Capitals Match Scorecard
Gujarat Titans Vs Delhi Capitals Match Scorecard (PTI)

IPL 2024, GT Vs DC Match Highlights : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली, दिल्ली कॅपिटल्सने (DC) इंडियन प्रीमियर लीग 2२०२४ मधील (IPL 2024) तिसरा विजय नोंदवला आहे. बुधवारी (१७ एप्रिल) झालेल्या सामन्यात दिल्ली संघाने गुजरात टायटन्सचा (G) ६ गडी राखून पराभव केला. हा सामना गुजरातच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.

ट्रेंडिंग न्यूज

प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा डाव केवळ ८९ धावांवर गारद झाला. गुजरातचे फक्त ३ खेळाडू दुहेरी आकडा पार करू शकले. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला चांगली सुरुवात झाली. कारण जेक फ्रेझर मॅकगर्कने दुसऱ्याच षटकातच संघाची धावसंख्या २० च्या पुढे नेली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना मॅकगर्क १० चेंडूत २० धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकारही मारले. दरम्यान, सातत्याने विकेट पडल्यामुळे दिल्लीचीही अवस्था थोडीशी संघर्षमय झाल्याचे दिसत होते.

मॅकगर्क बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉ, शे होप आणि अभिषेक पोरेल यांनी काही प्रमणात दिल्लीचा डाव सावरला. कमी धावसंख्येच्या सामन्यात अभिषेकने केवळ ७ चेंडूत १५ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि १ षटकारही लगावला. पॉवरप्लेच्या ६  षटकांत दिल्लीची धावसंख्या ६७ धावांपर्यंत पोहोचली होती, पण संघाने ४ विकेट्सही गमावल्या होत्या. 

आता संघाला विजयासाठी केवळ २३ धावा हव्या होत्या, मात्र सतत पडणाऱ्या विकेट्समुळे डीसीच्या फलंदाजांवर दडपण येऊ लागले. अशा परिस्थितीत कर्णधार ऋषभ पंतने जबाबदारी स्वीकारली, ज्याने ११ चेंडूत १६ धावांची खेळी करत संघाचा ६ विकेट्स राखून विजय निश्चित केला. ६७ चेंडू शिल्लक असताना दिल्लीने मिळवलेल्या या विजयामुळे त्यांच्या नेट रनरेटमध्ये बरीच सुधारणा झाली आहे.

दिल्लीने हा सामना ६ गडी राखून एकतर्फी जिंकला. दिल्लीकडून गोलंदाजीत मुकेश कुमारने ३ बळी घेत गुजरात टायटन्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याच्याशिवाय इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सनेही एकाच षटकात २ बळी घेत गुजरातला बॅकफूटवर पाठवले.

यानंतर , जेक फ्रेझर मॅकगुर्कने दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा पाया रचला. त्याने २० धावांची झंझावाती खेळी केली नसती तर डीसीवर सुरुवातीलाच दडपण आले असते. त्यानंतर अभिषेक पोरेल आणि शे होप यांनी केलेल्या फलंदाजीमुळे सामना एकतर्फी झाला. 

IPL_Entry_Point