महिला प्रीमियर लीगचा (WPL 2024) अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीचा संघ १८.३ षटकात ११३ धावांवर गारद झाला.
आता WPL चे जेतेपद जिंकण्यासाठी आरसीबीला ११४ धावा करायच्या आहेत. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीला आलेल्या कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी धमाकेदार सुरुवात केली. त्यांनी विकेटसाठी ७ षटकात ६४ धावा जोडल्या. पण त्यानंतर दिल्लीला अचानक गळती लागली आणि संपूर्ण संघ ११३ धावांवर गारद झाला.
दिल्लीसाठी शेफाली वर्माने २७ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. तर कर्णधार मेग लॅनिंगने २३ धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने ४ आणि सोफी मोलिनेक्सने ३ बळी घेतले.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली होती. संघाने ७ षटकात एकही विकेट न गमावता ६४ धावा केल्या होत्या. पण इथून फिरकीपटू सोफी मोलिनक्सने चमत्कार घडवला आणि पहिल्या ४ चेंडूत ३ विकेट घेत आरसीबीला सामन्यात परत आणले.
सर्वात आधी शेफाली (४४) सीमारेषेवर झेलबाद झाली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि ॲलिस कॅप्सी शुन्यावर बोल्ड झाल्या. सोफी मोलिनक्सने दोघींना क्लीन बोल्ड केले.
यानंतर चौथा धक्का ७४ च्या स्कोअरवर बसला. श्रेयंका पाटीलने कर्णधार मेग लॅनिंगला (२३) एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर आशा शोभनाने त्याच षटकात मारिजाने केप (८) आणि जेस जोनासेन (३) यांना बळी बनवले. या सततच्या धक्क्यांमुळे दिल्लीचा डा सावरू शकला नाही आणि ११३ धावांवर आटोपला.
संबंधित बातम्या