मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Dean Elgar Farewell : विराटनं विकेटचं सेलिब्रेशन थांबवलं, टीम इंडियानं दिलेला सन्मान पाहून डीन एल्गर भारावला

Dean Elgar Farewell : विराटनं विकेटचं सेलिब्रेशन थांबवलं, टीम इंडियानं दिलेला सन्मान पाहून डीन एल्गर भारावला

Jan 04, 2024 10:56 AM IST

Dean Elgar Farewell Virat Kohli : डीन एल्गरने त्याच्या शेवटच्या कसोटीचे दोन्ही डाव एकाच दिवशी खेळले. सामन्याच्या पहिल्याच दिवशी एल्गर दोनदा बाद झाला. दुसऱ्या डावात एल्गर बाद झाला तेव्हा मैदानात उपस्थित सर्वांनी त्याला निरोप दिला. हा क्षण अतिशय भावनिक होता.

Dean Elgar Farewell
Dean Elgar Farewell (PTI)

dean elgar farewell : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डीन एल्गरच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यानंतर एल्गर दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीत दिसणार नाही. एल्गरने मालिका सुरू होण्याआधीच निवृत्तीची घोषणा केली होती.

दरम्यान, डीन एल्गरने त्याच्या शेवटच्या कसोटीचे दोन्ही डाव एकाच दिवशी खेळले. सामन्याच्या पहिल्याच दिवशी एल्गर दोनदा बाद झाला. दुसऱ्या डावात एल्गर बाद झाला तेव्हा मैदानात उपस्थित सर्वांनी त्याला निरोप दिला. हा क्षण अतिशय भावनिक होता.

विशेषत: टीम इंडियाच्या खेळाडूंनीही डीन एल्गरला आदराने निरोप दिला. यावेळी विराट कोहलीने केलेले कृत्य चांगलेच चर्चेत आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विराटसह भारतीय खेळाडूंनी एल्गरला दिला निरोप

वास्तविक, सामन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे बुधवारी (३ जानेवरा) एकूण २३ विकेट पडल्या. केपटाऊनच्या वेगवान आणि अनियमितपणे उसळणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड होते. त्यामुळे दिवसभर विकेट पडत राहिल्या.

पहिल्या कसोटीत १८५ धावा करणारा डीन एल्गर या सामन्यात एकाच दिवशी दोनदा बाद झाला. पहिल्या डावात एल्गर ४ धावा करून बाद झाला आणि दुसऱ्या डावातही त्याला केवळ १२ धावा करता आल्या. म्हणजेच त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा डाव सामन्याच्या पहिल्याच दिवशी संपुष्टात आला.

पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात मुकेश कुमारने एल्गरला पॅव्हेलियनमध्ये पावठवले. यानंतर एल्गर पव्हेलियनच्या दिशेने जायला निघाला, तेव्हा भारतीय खेळाडूंनी विकेटचे सेलिब्रेशन थांबवले. सर्वांनी डीन एल्गरच्या पाठीवर थोपटले. तर एल्गरचा कॅच घेणारा विराट कोहलीही त्याच्याकडे धावला आणि त्याला मिठी मारली. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह देखील एल्गारला मिठी मारताना दिसले.

भारतीय खेळाडूंकडून हा सन्मान मिळाल्यानंतर एल्गर भावूक झालेला दिसला. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येकजण उभा राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना दिसला.

एल्गरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

३६ वर्षीय एल्गरने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या कारकिर्दीत फक्त ८ एकदिवसीय सामने खेळले परंतु कसोटी सामन्यांमध्ये तो प्रोटीज संघाचा नियमित खेळाडू होता. एल्गरने ८६ कसोटी सामने खेळले. या दरम्यान त्याने ५३४७ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये एल्गरच्या नावावर १४ शतके आणि २३ अर्धशतके आहेत.

WhatsApp channel