DC vs SRH Match Report: सनरायझर्स हैदराबाद दिल्ली कॅपिटल्सवर ६७ धावांनी विजय
आयपीएलच्या ३५व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा ६७ धावांनी पराभव केला.
DC vs SRH Live Updates: दिल्ली कॅपिटल्सची तिसरी विकेट पडली, फ्रेझर १८ चेंडूत ६५ धावा करून बाद
दिल्ली कॅपिटल्सला सातव्या षटकात तिसरा धक्का बसला. फ्रेझर १८ चेंडूत ६५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि सात षटकार मारले.
DC vs SRH Live Score: हैदराबादच्या १३ षटकांत १८४ धावा
सनरायझर्स हैदराबादने १३ षटकांत ४ विकेट गमावून १८४ धावा केल्या. नितीश १५ आणि शाहबाज १३ धावांसह खेळत आहेत.
DC vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा ट्रॅव्हिस हेडचे शतक हुकले
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड ८९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कुलदीप यादवला तिसरे यश मिळाले आहे. हेडने ३२ चेंडू खेळताना ११ चौकार आणि ६ षटकार मारले.
दिल्ली कॅपिटल्स वि सनरायझर्स हैदराबाद खेळपट्टी अहवाल
अरुण जेटली स्टेडियमची सीमा थोडी लहान आहे. मात्र, गोलंदाजांना विकेटची मदत मिळेल. फलंदाजांना जास्तीत जास्त धावा करण्याची संधी असेल. सामन्यादरम्यान दव पडण्याचाही प्रभाव असेल.
DC vs SRH: नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे.
DC vs SRH: जयदेव उनाडकट आज खास शतक झळकावणार?
सनरायझर्स हैदराबादचा भाग असलेला वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आज एक विशेष शतक करू शकतो. उनादकटचा हा १०० वा आयपीएल सामना असेल.
IPL 2024: दिल्ली कॅपिटल्स संघ
पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), सुमित कुमार, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, कुमार कुशाग्रा. प्रवीण दुबे, ललित यादव, लिझाद विल्यम्स, डेव्हिड वॉर्नर, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, यश धुल, मिचेल मार्श, रिकी भुई, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा
IPL 2024: सनरायझर्स हैदराबाद संघ
भिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, झटवेध सुब्रमण्यन, संवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जॉन्सन, आकाश महाराज सिंग, मयंक अग्रवाल.