Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएल २०२५ चा चौथा सामना (२४ मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. विशाखपट्टणमच्या वाय एस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजी करेल.
दिल्लीकडून केएल राहुल आज खेळत नाहीये. दिल्ली संघात मिचेल स्टार्क, फाफ डू प्लेसिस, ट्रस्टन स्टब्स आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांना संधी मिळाली आहे. तर लखनौमध्ये मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन आणि डेव्हिड मिलर आजचा सामना खेळत आहेत.
दिल्ली कॅपिटल्स- जॅक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.
लखनौ सुपर जायंट्स- एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर आणि रवी बिश्नोई.
लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत लखनौने ३ सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने १ सामना जिंकला. आयपीएल २०२४ च्या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीने लखनौचा पराभव केला होता.
स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल पहिला सामना खेळणार नाही. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, केएल सामन्यापूर्वी त्याच्या घरी परतला आहे. खरंतर त्याची पत्नी अथिया शेट्टी कधीही मुलाला जन्म देऊ शकते.
लखनौसाठी गोलंदाजी विभाग चिंतेचा विषय आहे. कारण त्यांचे भारतीय वेगवान गोलंदाज मयंक यादव, आवेश खान आणि आकाशदीप अजूनही दुखापतीतून सावरत आहेत. अष्टपैलू शार्दुल ठाकूरचा संघात समावेश केल्याने लखनौला बळ मिळाले आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मोहसिन खानच्या जागी शार्दुलचा संघात समावेश करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या