कोलकात्याने दिल्लीला १०६ धावांनी हरवलं, ऋषभ पंतची एकतर्फी झुंज व्यर्थ
आयपीएलच्या सोळाव्या सामन्यात कोलकाता आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांच्या समोर आले. या सामन्यात कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करत दिल्लीविरुद्ध २७२ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. प्रत्त्युत्तरात दिल्लीचा संघ १६६ धावांवर आटोपला.
DC vs KKR: सुनील नारायणची वादळी खेळी, कोलकात्याचं दिल्ली समोर २७३ धावांचं लक्ष्य
कोलकाता नाईट रायडर्सने विशाखापट्टणममध्ये मोठी धावसंख्या उभारली आहे. कोलकाताच्या संघाने दिल्लीसमोर २० षटकांत सात विकेट गमावून २७३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. २७२ धावा ही आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या हंगामात आयपीएलची सर्वात मोठी धावसंख्याही झाली होती. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध (२७ मार्च २०२४) २७७ धावा केल्या होत्या.
DC vs KKR: कोलकात्याने पहिली विकेट गमावली
कोलकाताला पहिला धक्का पाचव्या षटकात ६० धावांवर बसला. अँरिक नॉर्टजेने फिल सॉल्टला ट्रिस्टन स्टब्सकडे झेलबाद केले.
DC vs KKR Toss Report: कोलकात्याचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
दिल्लीविरुद्ध टॉस जिंकत कोलकात्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
DC vs KKR Head to Head: दिल्ली- कोलकाता यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि कोलकात्याचा संघ आतापर्यंत ३२ वेळा एकमेकांसमोर आला आहे. आकडेवारी पाहता कोलकात्याचा संघ वरचढ दिसत आहे. कोलकात्याने १६ सामने जिंकले आहेत. तर, दिल्लीच्या संघाने १५ सामन्यात विजय मिळवला आहे.
DC vs KKR Probable XI: दिल्ली- कोलकाता यांच्यातील संभाव्य संघ
दि्ल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकिपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
कोलकाता नाइट रायडर्स: फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरायण, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
DC vs KKR: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना कुठे पाहायचा? वाचा
विशाखापट्टणम येथील डॉ. व्हाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए- व्हीडीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज सामना खेळला जाणार आहे. सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.