मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs KKR: कोलकात्याची विजयी हॅट्ट्रिक; दिल्लीला १०६ धावांनी हरवलं, ऋषभ पंतची एकाकी झुंज व्यर्थ

DC vs KKR: कोलकात्याची विजयी हॅट्ट्रिक; दिल्लीला १०६ धावांनी हरवलं, ऋषभ पंतची एकाकी झुंज व्यर्थ

Apr 04, 2024 12:19 AM IST

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals: दिल्लीला १०६ धावांनी नमवून कोलकात्याने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे.

आयपीएलच्या सोळाव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्लीचा मोठ्या फरकाने पराभव केला.
आयपीएलच्या सोळाव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्लीचा मोठ्या फरकाने पराभव केला.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या सोळाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत झाली. विशाखापट्टणम येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या कोलकाताच्या संघाने २० षटकांत सात विकेट्स गमावून २७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव १७.२ षटकात १६६ धावांत आटोपला. केकेआरने हा सामना १०६ धावांनी जिंकला. कोलकाता हा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. कोलकात्याने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.

कोलकात्याकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सुनील नारायणने (८५ धावा) सुरुवातीपासूनच फटकेबाजीला सुरुवात केली. अंगक्रिश रघुवंशी यानेही २७ चेंडूत ५४ धावा ठोकल्या. तसेच आंद्रे रसेलने २९ चेंडूत ४१ धावा केल्या. कोलकात्याने २० षटकांत सात विकेट गमावून २७२ धावा केल्या. दिल्लीकडून नॉर्खियाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली. डेव्हिड वॉर्नर १८ धावा करून बाद झाला. कर्णधार ऋषभ पंत (५५ धावा) आणि स्टब्स (५४ धावा) चांगली फलंदाजी केली. परंतु, दोघेही मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. त्यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कोलकात्याकडून वेभव आरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

Shivam Mavi Ruled Out: लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का, शिवम मावी आयपीएल २०२४ मधून बाहेर, कारण काय?

 

ऋषभ पंतचे वादळी अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार ऋषभ पंतने तुफानी फलंदाजी केली. त्याने २३ चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. याआधी पंतने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही तुफानी इनिंग खेळली होती.

 

Suryakumar Yadav: मुंबईच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज; सूर्यकुमार यादवची दुखापतीवर मात, लवकरच संघात परततोय!

 

कोलकात्याचा संघ:

फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), सुनील नरायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

दिल्लीचा संघ:

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकिपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

WhatsApp channel
विभाग