मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs KKR Toss Report: कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार!

DC vs KKR Toss Report: कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 03, 2024 07:31 PM IST

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोलकात्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या सोळाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.
आयपीएलच्या सोळाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.

IPL 2024: विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या १६व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) प्रथम गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. दिल्लीने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर (Chennai Super Kings) विजय मिळवत दिल्लीचा संघ विजयी मार्गावर परतला आहे. त्याचबरोबर कोलकाताने आत्तापर्यंतचे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. यामुळे दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील आजचा सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.

या सामन्यासाठी कोलकात्याने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सचा मुकेश कुमार दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.कोलकात्याने आंगक्रिश रघुवंशीला पदार्पणाची संधी दिली. सुमित कुमारच्या जागी मुकेश कुमारची निवड करण्यात आल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सने दिली.

Shivam Mavi Ruled Out: लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का, शिवम मावी आयपीएल २०२४ मधून बाहेर, कारण काय?

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि कोलकात्याचा संघ ३२ वेळा एकमेकांशी भिडले. यातील १६ सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला आहे. तर, दिल्लीच्या संघाने १५ सामने जिंकले आहेत. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला आहे. दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील आजचा सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.

DC vs KKR Head to Head: दिल्ली कॅपिटल्स - कोलकाता नाइट राययर्स किती वेळा आमने- सामने आले, कोणी वर्चस्व गाजवलं? वाचा

कधी, कुठे पाहायचा सामना?

विशाखापट्टणम येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास म्हणजेच ७ वाजता नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग केले जात आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन:

फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन:

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

WhatsApp channel