IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत असल्याने संघाचे मनोबल वाढले आहे. चेन्नईविरुद्ध अखेरच्या सामन्यात ऋषभ पंतने अर्धशतक झळकावून दिल्लीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दिल्लीने सुरुवातीचे दोन सामन्यात पराभव मिळवल्यानंतर चेन्नईविरुद्ध अखेरच्या सामन्यात विजय मिळवत पुनरागमन केले. आज दिल्लीचा सामना अपराजित कोलकात्याशी होणार आहे. कोलकात्याने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामने जिंकले आहेत. दरम्यान, दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.
आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि कोलकात्याचा संघ आतापर्यंत ३२ वेळा एकमेकांसमोर आला आहे. आकडेवारी पाहता कोलकात्याचा संघ वरचढ दिसत आहे. कोलकात्याने १६ सामने जिंकले आहेत. तर, दिल्लीच्या संघाने १५ सामन्यात विजय मिळवला आहे. याशिवाय, याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला आहे. दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील विजयाचे अंतर फार मोठे नाही. आजच्या सामन्यात दिल्लीचा संघ हेच अंतर मिटवण्यासाठी मैदानात उतरेल. तर, कोलकाता आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतव्यतिरिक्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (५२ धावा) आणि पृथ्वी शॉने ४३ धावांचे योगदान दिले. कोलकात्याविरुद्ध दिल्लीची सलामी जोडी मोठी भागिदारी रचण्याचा प्रयत्न करेल. दिल्लीचा स्टार खेळाडू मिचेश मार्श आणि वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्खिया फॉर्ममध्ये नाही, जो चिंतेचा विषय आहे.
आरसीबीवरील विजयाने कोलकाताचा आत्मविश्वास वाढला आहे. आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर आणि फिल सॉल्ट यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. दिल्लीला या तिघांपासूनच सावध राहावे लागेल. कर्णधार श्रेयसनेही आरसीबीविरुद्ध नाबाद ३९ धावा केल्या. कोलकात्याकडे रिंकू सिंहसारखा फिनिशर आहे, ज्यात कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची क्षमता आहे. कोलकात्याकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे.
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिचेल मार्श, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, अॅनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.
कोलकाता नाइट रायडर्स: फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंह, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा.