इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) १७ व्या मोसमातील १३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. विशाखापट्टणमच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार आहेत. दिल्लीने विशाखापट्टणमलादेखील आपले होम ग्राऊंड बनवले आहे. संघ येथे २ सामने खेळणार आहे.
दिल्ली कॅपिटल्ससाठी हा हंगाम आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे राहिला नाही, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचा पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने तर त दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पराभवाचा धक्का दिला.
दुसरीकडे, गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत २ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी या दोन्ही सामन्यांमध्ये शानदार विजय मिळवला आहे. चेन्नई संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे आणि हा सामना जिंकून आपले स्थान कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
दरम्यान, दिल्ली असो की सीएसके , दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match taam prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल. पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रचिन रवींद्र - तुम्ही रचिन रवींद्रला तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये कर्णधार म्हणून निवडू शकता. रचिनने गेल्या सामन्यात आपल्या स्फोटक खेळीने सर्वांना प्रभावित केले होते. रचिन गोलंदाजीही करू शकतो. अशा परिस्थितीत कर्णधार म्हणून त्याची निवड आपल्यासाठी योग्य ठरू शकते.
मुस्तफिजुर रहमान - उपकर्णधार म्हणून तुम्ही मुस्तफिजुर रहमानची निवड करू शकता, त्याने पहिल्या २ सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी केली. तो आपल्या संथ चेंडूंनी फलंदाजांना अडचणीत आणतो. अशा परिस्थितीत तो विशाखापट्टणमवर खूप उपयुक्त ठरू शकतो.
यष्टिरक्षक - एमएस धोनी, ऋषभ पंत.
फलंदाज - ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र (कर्णधार), शिवम दुबे, डेव्हिड वॉर्नर.
अष्टपैलू - डॅरिल मिशेल, मिचेल मार्श, अक्षर पटेल
गोलंदाज - मुस्तफिझूर रहमान (उपकर्णधार), खलील अहमद
संबंधित बातम्या