Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! निवृत्तीच्या एका दिवसानंतर शिखर धवनचा चाहत्यांना सुखद धक्का, या लीगमध्ये खेळणार-days after announcing international retirement shikhar dhawan joins legends league cricket starting in september 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! निवृत्तीच्या एका दिवसानंतर शिखर धवनचा चाहत्यांना सुखद धक्का, या लीगमध्ये खेळणार

Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! निवृत्तीच्या एका दिवसानंतर शिखर धवनचा चाहत्यांना सुखद धक्का, या लीगमध्ये खेळणार

Aug 26, 2024 02:45 PM IST

शिखर धवन याने २४ ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली होती. आता त्याने एका नवीन लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये युवराज सिंगसह अनेक निवृत्त क्रिकेटपटू खेळतात.

Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! निवृत्तीच्या एका दिवसानंतर शिखर धवनचा चाहत्यांना सुखद धक्का, या लीगमध्ये खेळणार
Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! निवृत्तीच्या एका दिवसानंतर शिखर धवनचा चाहत्यांना सुखद धक्का, या लीगमध्ये खेळणार (PTI)

टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन याने शनिवारी (२४ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ३८ वर्षीय धवनच्या निवृत्तीची बातमी ऐकून भारतीय चाहत्यांना धक्का बसला होता, मात्र आता धवनने लोकांना एक आनंदाची बातमी सांगितली आहे.

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्याने लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्याची घोषणा केली आहे.

शिखर धवनने २०१० मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते आणि २०२२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या काळात धवन भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी-२०१३ च्या विजेत्या संघाचा भाग होता.

पीटीआयच्या वृत्तानुसार, शिखर धवनने म्हटले आहे की, “एलएलसीमध्ये सामील होणे हा माझ्यासाठी निवृत्तीनंतरचा सर्वात आदर्श निर्णय वाटतो. क्रिकेट खेळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझे शरीर अजूनही तंदुरुस्त आहे. मी निवृत्ती घेतली आहे आणि या निर्णयाने खूश आहे, पण क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, जो माझ्यापासून कधीही हिरावून घेतला जाऊ शकत नाही”.

लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) कधी सुरू होईल?

लिजेंड्स लीग क्रिकेटचा पुढील सीझन सप्टेंबर महिन्यात सुरू होईल, ज्यामध्ये निवृत्त क्रिकेटपटूंचे संघ खेळताना दिसतील. या लीगमध्ये युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि हरभजन सिंगसह अनेक परदेशी क्रिकेटर्सही खेळताना दिसले आहेत.

एलएलसीचे सह-संस्थापक रमन रहेजा यांनीही शिखर धवनच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. धवनच्या आगमनाने लीगमधील स्पर्धेची पातळी वाढेल आणि आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहिल्यानंतर चाहते अधिक उत्साह दाखवतील, असे ते म्हणाले.

धवनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने १६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६,७९३ धावा केल्या. त्याच्या नावावर ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये १७ शतके आणि ३९ अर्धशतके आहेत. याशिवाय त्याने ३४ कसोटी सामन्यांमध्ये २,३१५ धावा आणि ६८ टी-20 सामन्यात १,७५९ धावा केल्या आहेत.