मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  David Warner : डेव्हिड वॉर्नरची रॉयल एन्ट्री, BBL चा सामना खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने मैदानात पोहोचणार

David Warner : डेव्हिड वॉर्नरची रॉयल एन्ट्री, BBL चा सामना खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने मैदानात पोहोचणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 11, 2024 05:26 PM IST

David Warner Helicopter Entry BBL : डेव्हिड वॉर्नर बिग बॅश लीगमधील सिडनी थंडर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील महत्वाचा सामना खेळणार आहे. हा सामना SCG वर शुक्रवारी (१२ जानेवारी) होणार आहे.

David Warner BBL
David Warner BBL

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. गेल्याच आठवड्यात सिडनी क्रिकेट मैदानावर त्याने पाकिस्तानविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. आता डेव्हिड वॉर्नर लीग क्रिकेट (BBL) खेळताना दिसणार आहे.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नर बिग बॅश लीगमधील सिडनी थंडर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील महत्वाचा सामना खेळणार आहे. हा सामना SCG वर शुक्रवारी (१२ जानेवारी) होणार आहे. या सामन्यात वॉर्नर चक्क हेलिकॉप्टरने मैदानात येणार आहे.

विशेष म्हणजे, शुक्रवारीच वॉर्नरच्या भावाचे लग्न आहे. तो लग्नातून थेट हेलिकॉप्टरने मैदानात पोहोचेल. याआधी तो शेजारील अलियान्झ स्टेडियमवर उतरणार होता, पण आता प्लॅन बदलला आहे.

वॉर्नर सामन्यापूर्वी पोहोचेल

डेव्हिड वॉर्नरचे हेलिकॉप्टर मैदानाच्या मधोमध उतरणार आहे. हे तेच ठिकणा आहे, ज्याठिकाणी त्याच्या करिअरच्या शेवटच्या कसोटीत डावात थँक्यू डेव्ह असे लिहिले होते.

जर हवामान चांगले असेल तर लग्नानंतर तो थेट हंटर व्हॅलीहून सेसनॉक विमानतळावर जाईल आणि संध्याकाळी ५ वाजता मैदानावर पोहोचेल. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.१५ वाजता सामना सुरू होईल. सिडनी थंडर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामना बिग बॅशमधील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक मानला जातो.

सहकारी खेळाडू काय म्हणाला?

याबाबत सिडनी थंडरचा गोलंदाज गुरिंदर संधू म्हणाला, 'तो आमच्याकडून खेळण्यासाठी खूप मेहनत घेत आहे, हे आश्चर्यकारक आहे. मागच्या वर्षीही तो जबरदस्त फॉर्मात होता. सांघिक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी आणि खेळाडूंना प्रेरित करण्यात तो नेहमी पुढे असतो. डेव्हिडला क्रिकेट खेळताना पाहणे सर्व चाहत्यांना आवडेल.

संघाच्या नावावर फक्त एकच विजय

बिग बॅश लीगच्या या मोसमात सिडनी थंडरच्या नावावर आतापर्यंत फक्त एकच विजय आहे. थंडरच्या संघाने ७ पैकी ५ सामने गमावले आहेत. ८ संघांच्या लीगमध्ये ते सातव्या क्रमांकावर आहेत. आता सिडनी थंडरसाठी बाद फेरी गाठणे सोपे नाही.

WhatsApp channel