David Warner Sledging Steve Smith : बिग बॅश लीगमध्ये ३४ वा सामना (१२ जानेवारी) सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सिडनी सिक्सर्सने १९ धावांनी विजय मिळवला.
पण या सामन्याशी संबंधित एका व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या व्हिडीओत डेव्हिड वॉर्नर त्याचाच मित्र स्टीव्ह स्मिथविरुद्ध स्लेजिंग करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू वॉर्नर आणि स्मिथ खूप चांगले मित्र आहेत. पण दोघेही बिग बॅश लीगमध्ये वेगवेगळ्या संघांसाठी खेळत आहेत.
वास्तविक, सिडनी सिक्सर्स संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सिक्सर्ससाठी स्टीव्ह स्मिथ आणि जेम्स विंन्स सलामीला आले. तर थंडरसाठी डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता.
स्मिथ मैदानात पोहोचताच वॉर्नरने त्याला स्लेजिंग करण्यास सुरुवात केली. यानंतर पहिल्याच चेंडूवर स्मिथने आपली विकेट गमावली. तो झेलबाद बिग बॅश लीगने स्मिथच्या कॅच आऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वॉर्नर स्मिथला स्लेजिंग करताना दिसत आहे.
या सामन्यात सिक्सर्स संघाने प्रथम फलंदाजी करत १५१ धावा केल्या होत्या. यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिपने ३५ चेंडूंचा सामना करत ४७ धावा केल्या. त्याच्या खेळीत ७ चौकारांचा समावेश होता. तर विन्सने २७ चेंडूत २७ धावा केल्या.
सिक्सर्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिडने थंडर्सचा संघ १३२ धावा करून सर्वबाद झाला. यादरम्यान वॉर्नरने ३९ चेंडूंचा सामना करत ३७ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि २ षटकार मारले. तर अॅलेक्स हेल्सने १७ चेंडूंचा सामना करत २८ धावा केल्या. याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही.