मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  David Warner : डेव्हिड वॉर्नर निवृत्तीनंतर काय करणार? समोर आली वेगळीच माहिती, पाहा

David Warner : डेव्हिड वॉर्नर निवृत्तीनंतर काय करणार? समोर आली वेगळीच माहिती, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 04, 2024 02:52 PM IST

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या जर्सीमध्ये खेळताना कधीही दिसणार नाही. पण यादरम्यान आता डेव्हिड वॉर्नर निवृत्तीनंतर काय करणार? याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

David Warner
David Warner (AFP)

 david warner retirement : ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार डेव्हिड वॉर्नर त्याच्या करिअरचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेेळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी येथे कसोटी सामना खेळला जात आहे. हाच वॉर्नरच्या करिअरचा शेवटचा सामना आहे.

यानंतर डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या जर्सीमध्ये खेळताना कधीही दिसणार नाही. पण यादरम्यान आता, डेव्हिड वॉर्नर निवृत्तीनंतर काय करणार? याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

अशातच आता वॉर्नर कसोटी मालिकेदरम्यान समालोचकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे. कॉमेंटेटर म्हणून डेव्हिड वॉर्नरची पहिली मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका असू शकते. 

खरंतर टीम इंडियाला या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. येथे टीम इंडिया ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नर समालोचकाची भूमिका बजावू शकतो., 

डेव्हिड वॉर्नरच्या या नव्या भूमिकेबद्दल क्रिकेट चाहते आधीच उत्सुक आहेत. वॉर्नर क्रिकेटच्या मैदानावरही डान्सच्या माध्यमातून चाहत्यांचे खूप मनोरंजन करत असतो. मैदानाबाहेरही तो सोशल मीडियावर आपल्या मजेशीर व्हिडिओंनी आणि रील्सनी चाहत्यांना गुंतवून ठेवतो. अशा परिस्थितीत वॉर्नर क्रिकेटपटूपेक्षा समालोचक म्हणून अधिक यशस्वी ठरेल, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

वॉर्नरने वनडे क्रिकेटलाही निरोप दिला

पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका आहे. यासह यावर्षाच्या सुरुवातीला वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली. अशाप्रकारे २०२३ च्या विश्वचषकातील अंतिम सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना ठरला.

मात्र, वॉर्नरने २०२५ मध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपण उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. यासोबतच तो जगभरातील फ्रँचायझी टूर्नामेंटमध्ये टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

WhatsApp channel