मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  David Warner: कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यापूर्वी डेव्हिडवॉर्नरच्या बॅगी ग्रीन कॅपची चोरी

David Warner: कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यापूर्वी डेव्हिडवॉर्नरच्या बॅगी ग्रीन कॅपची चोरी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 02, 2024 01:22 PM IST

David Warner Baggy Green Cap Missing: पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरची बॅगी ग्रीन कॅप चोरीला गेली आहे.

David Warner
David Warner

David Warner Baggy Green Cap Stolen: पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांच्या तीन सामान्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखरेचा सामना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल. या सामन्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने त्याची मौल्यवान बॅगी ग्रीन कॅप चोरीला गेल्याची इंन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तसेच ही कॅप त्याला परत करण्याची विनंती केली.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वॉर्नर म्हणाला की, "दुर्दैवाने, हा माझा शेवटचा उपाय आहे, परंतु, माझी बॅगी ग्रीन कॅप मेलबर्न विमानतळावरून नेण्यात आलेल्या सामानातून काढून घेण्यात आली. जर कोणाला बॅग हवी असेल तर, त्याच्याजवळ एक शिल्लक आहे. कॅप परत करणाऱ्याला कोणतीही अचडण येणार नाही. माझी बॅगी ग्रीन कॅप परत केल्यास मला आनंद होईल.” क्वांटास एअरलाइनद्वारे त्याची बॅग नेण्यात आली. परंतु, क्वांटास एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी विमानतळावरील कॅमेऱ्यांची तपासणी केली असता कोणीही बॅग उघडताना किंवा बॅग घेताना दिसला नाही.

डेव्हिड वॉर्नर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

डेव्हिड वॉर्नरने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ३ जानेवारी खेळला जाणारा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल, असे त्याने स्पष्ट केले आहे.डेव्हिड वॉर्नरने अचानक घेतलेला निर्णय ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

डेव्हिड वॉर्नरची एकदिवसीय आणि कसोटी कारकिर्द

डेव्हिड वॉर्नरने १६१ एकदिवसीय आणि १११ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४५.३० सरासरीने आणि ९७.२६ स्ट्राईक रेटने ६ हजार ९३२ धावा केल्या. ज्यात २२ शतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ४४.५८ च्या सरासरीने ८ हजार ६९५ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरने २६ शतक झळकावली आहेत. डेव्हिड वॉर्नर दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा भागही होता.

WhatsApp channel

विभाग

For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi