मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  David Warner : सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उतरलं हेलिकॉप्टर, डेव्हिड वॉर्नरची फिल्मी स्टाईल एन्ट्री तर बघा

David Warner : सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उतरलं हेलिकॉप्टर, डेव्हिड वॉर्नरची फिल्मी स्टाईल एन्ट्री तर बघा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 12, 2024 03:46 PM IST

David Warner Helicopter Entry : डेव्हिड वॉर्नर बिग बॅश लीगचा सामना खेळण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरमधून आला. त्याचे हेलिकॉप्टर सिडने क्रिकेट ग्राउंडवर लँड झाले.

David Warner
David Warner

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. गेल्याच आठवड्यात सिडनी क्रिकेट मैदानावर त्याने पाकिस्तानविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. आता डेव्हिड वॉर्नर लीग क्रिकेट (BBL) खेळताना दिसणार आहे.

डेव्हिड वॉर्नर बिग बॅश लीगचा सामना खेळण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरमधून आला. त्याचे हेलिकॉप्टर सिडने क्रिकेट ग्राउंडवर लँड झाले.

BBL चा हा सामना सिडनी थंडर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात आहे. गेल्या आठवड्यात वॉर्नरने याच मैदानावर शेवटची कसोटी खेळली होती. वॉर्नर आपल्या भावाच्या लग्नातून थेट हेलिकॉप्टरमधून मैदानावर पोहोचला. त्याचे हेलिकॉप्टर थेट मैदानाच्या मधोमध उतरले.

हेलिकॉप्टरमधून स्टेडियमवर आल्यानंतर डेव्हिड वॉर्नर म्हणाला, की मी इथपर्यंत पोहोचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होतो आणि मला आशा आहे की आता सामन्यात थोड्या धावा करेन. जर मी एकही धाव काढू शकलो नाही तर माजी थट्टा उडवली जाईल. पण हे माझे योगदान केवळ बीबीएलसाठीच नाही तर संपूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आहे. मला इथे खेळायचे आहे. मला मनोरंजन करायचे आहे. मला माझ्या संघाला पुढील तिन्ही सामने जिंकून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत'.

वॉर्नर सिडनी थंडरसाठी तीन सामने खेळणार

वॉर्नरने गेल्या हंगामापूर्वी सिडनी थंडरसोबत २ वर्षांचा करार केला होता. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेमुळे तो सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. आता सिडनीचे तीन सामने बाकी आहेत. थंडरला बाद फेरी गाठण्याची संधी खूप कमी आहे. परंतु जर संघ बाद फेरीत पोहोचला तर वॉर्नरला त्या सामन्यांमध्येही खेळता येणार नाही. ILT20 मध्ये खेळण्यासाठी त्याला UAE ला जायचे आहे.

WhatsApp channel