दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर डेव्हिड मिलर हा नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. डेव्हिड मिलरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अक्रम याने मोठा खुलासा केला आहे.
डेव्हिड मिलरने पैशासाठी लग्न पुढे टाळले होते, असा दावा वसीम अक्रमने केला आहे.
वसीम अक्रम म्हणाला, की बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्युन बरीशालच्या ऑनरने डेव्हिड मिलरला लीगचे शेवटचे तीन सामने खेळण्यासाठी १.२५ कोटी रुपये दिले. यानंतर यानंतर मिलरने आपले लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
मात्र, बांगलादेश प्रीमियर लीगच्या फायनलनंतर डेव्हिड मिलरने त्याची गर्लफ्रेंड कॅमिला हॅरिसशी लग्न केले. कॅमिला आणि मिलर बराच काळ डेट करत होते. केपटाऊनमध्ये डेव्हिड मिलर आणि कॅमिला हॅरिस यांचा विवाह झाला. कॅमिला हॅरिस ही पोलो खेळाडू आहे.
डेव्हिड मिलर आणि कॅमिला हॅरिस यांच्या लग्नात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर क्विंटन डी कॉक आणि माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाउचर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेट उपस्थित झाले होते.
दरम्यान, डेव्हिड मिलर हा दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिनीशर आहे. तसेच, तो जगभरातील फ्रेंचाइजी लीग क्रिकेट खेळताना दिसतो. आयपीएलमध्ये डेव्हिड मिलर हा गुजरात टायटन्सचा भाग आहे.
याआधी डेव्हिड मिलर पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा भाग होता. आयपीएल २०२४ चा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, गुजरात टायटन्स २४ मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.
संबंधित बातम्या