IPL 2024: पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (Punjab Kings vs Chennai Super Kings) यांच्यात रविवारी आयपीएल २०२४ मधील ५३वा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईच्या संघाने पंजाबचा २८ धावांनी पराभव केला. या सामन्यापूर्वीचा डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात डॅरिल मिशेलच्या शॉटमुळे एका चाहत्याचा आयफोन (iPhone) फुटला. यानंतर नाराज झालेल्या चाहत्याला डॅरिल मिशेलने खास गिफ्ट दिले.
पंजाबविरुद्ध सामन्याआधी सराव दरम्यान मिशेल सीमारेषेजवळ उभा राहून लेग साईडच्या दिशेने शॉट्सचा सराव करत होता. लेग साईटला जाळी होती. मात्र, एक चेंडू जाळीवरून जाऊन स्टँडमध्ये बसलेल्या एका चाहत्याच्या आयफोनवर जाऊन आदळला. व्हायरल व्हिडिओमध्ये मिशेल सराव करताना आणि त्यानंतर चाहत्याचा फुटलेला आयफोन दिसत आहे. यानंतर मिशेल त्या चाहत्याला हातमोजे गिफ्ट म्हणून दिले. मिशेलने दिलेल्या गिफ्ट पाहून चाहता खूश झाला.
यंदाच्या हंगामात मिशेलने चेन्नई सुपरकिंग्जसाठी १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २८.६३ च्या सरासरीने आणि १३४.७१ च्य स्ट्राइक रेटने २२९ धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. आतापर्यंत मिशेलने फक्त दोन षटक गोलंदाजी केली, ज्यात त्याने १८ धावा खर्च केल्या असून एक विकेट मिळवली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यातील सहा सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने विजय मिळवला आहे. तर, पाच सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. चेन्नईचा संघ १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईचा निव्वळ रनरेट +०.७०० इतका आहे.
रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिझूर रहमान, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, शेख सिंधू, मोईन अली, मिचेल सँटनर, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, आरएस हंगरगेकर, अरावेली अवनीश.
संबंधित बातम्या