मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : डॅरेन सॅमीचं खतरनाक सेलिब्रेशन बघितलं का? उत्साहाच्या भरात डोक्यावर लॅपटॉप…

Viral Video : डॅरेन सॅमीचं खतरनाक सेलिब्रेशन बघितलं का? उत्साहाच्या भरात डोक्यावर लॅपटॉप…

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 29, 2024 12:28 PM IST

Darren Sammy Viral Video : वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक कसोटी विजयानंतर अनेक माजी दिग्गज खेळाडू भावूक झाले. त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Darren Sammy Viral Video after wi vs aus test
Darren Sammy Viral Video after wi vs aus test

Darren Sammy Celebration After Aus vs WI Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाब्बा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने इतिहास रचला. त्यांनी तब्बल ३० वर्षांनंतर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

हा सामना खूपच थरारक झाला. शेवटी वेस्ट इंडिजने अवघ्या ८ धावांनी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या सामन्याचा आणि मालिकेचा हिरो वेस्ट इंडिजा युवा गोलंदाज शमार जोसेफ ठरला. शमार जोसेफने याच मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा हा दुसरा कसोटी सामना होता.

दरम्यान, वेस्ट इंडिजच्या या ऐतिहासिक कसोटी विजयानंतर वेस्ट इंडिजचे अनेक माजी दिग्गज खेळाडू भावूक झाले. त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सामन्यात कॉमेंट्री करणाऱ्या ब्रायन लाराच्या डोळ्यात विजयानंतर पाणी आलेले दिसले. तर माजी कर्णधार कार्ल हूपरदेखील भावूक झालेला दिसला.

आता वेस्ट इंडिजला दोन टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार डॅरेन सॅमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत डॅरेन सॅमी खूप उत्साहित झाल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये डॅरेन सॅमी टीव्हीवर सामना पाहत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात शमार जोसेफने ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट म्हणून जोश हेझलवूडला क्लीन बोल्ड केले. यानंतर संपूर्ण संघाने मैदानात जल्लोष केला. तर सॅमीच्या अंगात देखील वेगळीच जादू संचारली आणि तो जोर-जोरात ओरडू लागला. आपल्या संघाचा विजय पाहून सॅमीला खूप आनंद झाला. या उत्साहाच्या भरात त्याचे डोके बेडवर ठेवलेल्या लॅपटॉवर आदळले. लॅपटॉप डोक्याला लागल्यानंतर तो आणखी तो ओरडायला लागला.

सामन्यात काय घडलं?

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची मालिका खेळली गेली. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर आता हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.

या डे-नाईट कसोटी सामन्यातील पहिल्या डावात वेस्ट इंडिजने ३११ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने २८९ धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे वेस्ट इंडिजला २२ धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १९३ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला २१६ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

२१६ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने १४१ चेंडूत नाबाद ९१ धावा केल्या तर वेस्ट इंडिजकडून शमार जोसेफने ६८ धावांत ७ विकेट घेतल्या. शमार जोसेफ प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज ठरला.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi