मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs PAK : बुटाच्या बरोबरीचाही नाही… बाबर आझमची कोहलीशी तुलना केल्याने पाकिस्तानी क्रिकेटर संतापला, वाचा

IND vs PAK : बुटाच्या बरोबरीचाही नाही… बाबर आझमची कोहलीशी तुलना केल्याने पाकिस्तानी क्रिकेटर संतापला, वाचा

Jun 09, 2024 04:35 PM IST

IND vs PAK T20 World Cup 2024 : भारत-पाकिस्तान सामन्याआधी दानिश कनेरियाने धक्कादायक विधान केले आहे. विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यातील तुलनेवरही त्याने हे विधान केले आहे.

IND vs PAK : बुटाच्या बरोबरीचाही नाही… बाबर आझमची कोहलीशी तुलना केल्याने पाकिस्तानी क्रिकेटर संतापला, वाचा
IND vs PAK : बुटाच्या बरोबरीचाही नाही… बाबर आझमची कोहलीशी तुलना केल्याने पाकिस्तानी क्रिकेटर संतापला, वाचा

T20 World Cup 2024 IND VS PAK : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा सर्वात मोठा सामना आज (९ जून) न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान महामुकाबला आज रात्री ८ वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

भारत आणि पाकिस्तानकडे क्रिकेट जगतातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. तसेच, दोन्ही देशांचे चाहते नेहमीच बाबर आझम आणि विराट कोहली यांची तुलना करतात. कारण आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बाबरने कोहलीला मागे सोडले आहे.

या तुलनेदरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने एक वादग्रस्त विधान केले आहे.

बाबर विराटच्या बुटाच्या बरोबरीचाही नाही

एका मीडिया मुलाखतीत भारत-पाक सामन्यावर चर्चा करताना दानिश कनेरिया म्हणाला, "जेव्हाही बाबर आझम शतक करतो, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याची विराट कोहलीशी तुलना सुरू होते. खरं तर बाबर विराटच्या बुटाच्या बरोबरीचाही नाही." यूएसएच्या गोलंदाजांनी त्याला धावा करण्यापासून रोखले, त्याला धावा काढणे कठीण होत होते. तो कसा तरी ४० धावा करण्यात यशस्वी झाला आणि नंतर बाद झाला. त्याने क्रीजवर राहून पाकिस्तान संघाला विजयापर्यंत नेले पाहिजे. "पाक संघाने तो सामना एकतर्फी जिंकायला हवा होता."

'पाक संघ भारताला हरवण्यास सक्षम नाही'

टी-20 विश्वचषक २०२४ मधील पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. तर दुसरीकडे पाकिस्तानचा पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता, या सामन्यात त्यांना अमेरिकेकडून पराभव सहन करावा लागला. या परिस्थितीबद्दल बोलताना दानिश कनेरिया म्हणाला, "भारत पाकिस्तानला वाईट पद्धतीने पराभूत करेल. ते भारतीय संघाला पराभूत करण्यास सक्षम नाहीत. 

भारत जेव्हा जेव्हा विश्वचषक सामना खेळायला येतो तेव्हा पाकिस्तानी गोलंदाजीची अतिशयोक्ती केली जाते. असे म्हटले जाते की त्यांची गोलंदाजी त्यांना सामना जिंकून देईल, परंतु केवळ गोलंदाजीमुळे त्यांना पहिला सामना गमवावा लागला."

भारत आणि पाकि आठव्यांदा आमनेसामने 

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत ७ वेळा आमनेसामने आले आहेत. भारतीय संघ ७ सामन्यांपैकी ६ वेळा विजयी झाला आहे, परंतु २०२१ च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाने भारताचा १० विकेट्सने पराभव करून क्रिकेट जगताला थक्क केले होते. T20 विश्वचषक २०२४ मध्ये दोन्ही संघ आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४