महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. ऋतुराज गायकवाड सीएसेकचा नवा कर्णधार बनला आहे. गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएल २०२४ चा पहिला सामना खेळला. या सामन्यात सीएसकेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.
या सामन्यात सीएसकेचा विकेटकीपर फलंदाज एम एस धोनी आणि आरसीबीच्या दिनेश कार्तिकने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
धोनी आणि कार्तिक यांनी एका विशिष्ट रेकॉर्डमध्ये अंबाती रायडूला मागे टाकले आहे. धोनी आणि कार्तिक यांना टी-20 फॉरमॅटमध्ये खेळताना १७ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
धोनी आणि कार्तिक सर्वाधिक काळ टी-20 क्रिकेट खेळणारे भारतीय खेळाडू ठरले आहेत. कार्तिक आणि धोनीला ११७ वर्षे ११२ दिवस झाले आहेत. या दोघांची टी-20 कारकीर्द रायुडूपेक्षा जास्त काळ टिकली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे हे दोघे अजूनही खेळत आहेत. अंबाती रायुडूची T20 कारकीर्द १६ वर्षे ३११ दिवस चालली. रायुडू चेन्नई सुपर किंग्जकडूनही खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठीही चांगली कामगिरी केली आहे.
दिनेश कार्तिकने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या मोसमात १३ सामने खेळले. यात १४५ धावा केल्या. कार्तिकने आतापर्यंत २४३ आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने ४५५४ धावा केल्या आहेत. कार्तिकने या स्पर्धेत २० अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ९७ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
कार्तिकने गेल्या मोसमात १३ सामन्यात १४० धावा केल्या होत्या. आरसीबीपूर्वी कार्तिक दिल्ली, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जकडून खेळला आहे.
धोनीनेही २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत २५१ सामने खेळले आहेत. यात त्याने ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीने आयपीएलमध्ये २४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८४ धावा आहे.