CSK vs RCB Highlights : चेन्नई सुपर किंग्सची धमाकेदार सुरुवात, आरसीबीचा ६ विकेट्सनी धुव्वा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs RCB Highlights : चेन्नई सुपर किंग्सची धमाकेदार सुरुवात, आरसीबीचा ६ विकेट्सनी धुव्वा

CSK vs RCB Highlights : चेन्नई सुपर किंग्सची धमाकेदार सुरुवात, आरसीबीचा ६ विकेट्सनी धुव्वा

Published Mar 22, 2024 11:16 AM IST

CSK vs RCB Scorecard : चेन्नई सुपर किंग्जने दमदार कामगिरी करत आरसीबीचा सहा गडी राखून पराभव केला.

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore (CSK vs RCB) IPL Live Score
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore (CSK vs RCB) IPL Live Score (AP)

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore (CSK vs RCB) IPL : आयपीएल २०२४ चा थरार आज शुक्रवारपासून (२२ मार्च) सुरू झाला. आयपीएल २०२४ चा उद्घाटनाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्याच सीएसकेने आरसीबीचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला.

सीएसकेसमोर विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी ८ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. सीएसकेच्या विजयाचा हिरो मुस्तफिजुर रहमान ठरला, त्याने ४ विकेट घेतल्या.

फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर CSK कडून रचिन रवींद्रने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर इम्पॅक्ट खेळाडू शिवम दुबेने ३४ धावांची नाबाद खेळी खेळली.

१७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३८ (२४ चेंडू) धावांची भागीदारी केली. संघाला पहिला धक्का चौथ्या षटकात कर्णधार गायकवाडच्या रूपाने बसला, त्याने ३ चौकार मारून १५ धावा (१५ चेंडू) केल्या.

त्यानंतर अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. रहाणे आणि रचिन रवींद्र यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या.

यानंतर रहाणे २७ धावा करून बाद झाला. रहाणेने दोन शानदार षटकार खेचले. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅरिल मिशेलने दोन षटकारांच्या मदतीने २२ धावा काढल्या.

यानंतर चेन्नईने एकही विकेट गमावली नाही. रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६६* (३७ चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान शिवम दुबेने ३८* आणि जडेजाने २५* (१७ चेंडू) धावा केल्या.

या सामन्यात आरसीबीची गोलंदाजी अत्यंत खराब होती. मात्र, ग्रीनने ३ षटकांत २७ धावांत २ बळी घेतले. याशिवाय यश दयाल आणि कर्ण शर्मा यांना १-१ विकेट मिळाली. दयालने ३ षटकांत २८ धावा आणि कर्ण शर्माने २ षटकांत २४ धावा दिल्या.

CSK vs RCB Score Updates

CSK vs RCB Live Score : रचिन रविंद्र बाद

 चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का बसला आहे. कर्ण शर्माने रचीनला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. तो ३५ धावा करू शकला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि तीन षटकार आले. सध्या अजिंक्य रहाणे क्रीजवर उभा आहे. डॅरिल मिशेल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. ७ षटकांनंतर संघाची धावसंख्या ७१/२ आहे.

CSK vs RCB Live Score : चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का

 चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपाने बसला. तीन चौकारांच्या मदतीने १५ धावा करून तो बाद झाला. ऋतुराज आणि रचिन रवींद्र यांच्यात पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी झाली. अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

CSK vs RCB Live Score : चेन्नईचा डाव सुरू

आरसीबीने दिलेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईचा डाव सुरू झाला आहे. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र सलामीला आले आहेत. दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. पहिल्या षटकात संघाने आठ धावा केल्या आहेत.

सीएसकेसमोर १७४ धावांचे लक्ष्य

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सीएसकेला १७४ धावांचे लक्ष्य दिले आहे.  आरसीबीसाठी अनुज रावतने सर्वाधिक ४८ आणि दिनेश कार्तिकने ३८ धावा केल्या. तर मुस्तफिजुर रहमानने सीएसकेसाठी ४ विकेट मिळवले.

तत्पूर्वी, या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात चांगली झाली आणि कर्णधार डू प्लेसिससह विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. डुप्लेसिसने चांगली फलंदाजी करत ३५ धावांच्या खेळीत ८ चौकार लगावले. पण मुस्तफिजुर रहमानने एकाच षटकात डू प्लेसिस आणि रजत पाटीदार (००) यांना बाद केले.

त्यानंतर दीपक चहरने ग्लेन मॅक्सवेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्याला खातेही उघडता आले नाही. नंतर मुस्तफिझूरने विराट कोहली २१) आणि कॅमेरून ग्रीन (१८) यांना बाद करून आरसीबीला अडचणीत टाकले. येथून अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी ९५ धावा जोडून आरसीबीला १७० धावांचा टप्पा गाठून दिला. सीएसकेकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.

CSK vs RCB Live Score : आरसीबीचे ५ फलंदाज बाद

या सामन्यात आरसीबीचे फलंदाज फ्लॉप होताना दिसत आहेत. संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली १२व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याचवेळी त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनही पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोन्ही फलंदाज बांगलादेशचा घातक गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचे बळी ठरले. 

याआधी कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि रजत पाटीदार यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात तो यशस्वी ठरला होता. चेन्नईविरुद्ध दिनेश कार्तिक सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला असून त्याच्या सोबत अनुज रावतने मैदानात आहे. १२ षटकांनंतर संघाची धावसंख्या ५ बाद ७८ धावा आहे.

CSK vs RCB Live Score : डुप्लेसिस बाद

मुस्तफिझू रहमानने आरसीबीला पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार डुप्लेसिसला पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रचिन रवींद्रकरवी झेलबाद केले. ३९ वर्षीय डुप्लेसिस ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ८ चौकार मारले. 

CSK vs RCB Live Score : आरसीबीची फलंदाजी सुरू

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर आरसीबीने दमदार सुरुवात केली आहे. कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली सध्या क्रीजवर आहेत. दोन षटकांनंतर संघाची धावसंख्या १६ धावा.

CSK vs RCB Live Score : दोन्ही प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महीश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

इम्पॅक्ट : शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, शेख रशीद, निशांत सिंधू, मोईन अली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.

इम्पॅक्ट : यश दयाल, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, स्वप्नील सिंग, वैशाक विजयकुमार.

CSK vs RCB Live Score : आरसीबीची प्रथम फलंदाजी

आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात चेन्नईचा संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसत आहे तर आरसीबीचे नेतृत्व फाफ डू प्लेसिस करत आहे.

सीएसकेचे ४ परदेशी खेळाडू  - डॅरिल मिचेल, रचिन रवींद्र, महेश तिक्षना आणि मुस्तफिझूर रहमान 

बेंगळुरूचे ४ परदेशी खेळाडू  - कर्णधार फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ.

जय हो गाण्याने उद्घाटन सोहळ्याची सांगता

एआर रहमानने संपूर्ण टीमसोबत जय हो गाण्यावर परफॉर्म केले. या गाण्याने या सोहळ्याची सांगता झाली. 

नीती मोहनने गायलं बरसो रे मेघा-मेघा

नीती मोहननेही बरसो रे मेघा-मेघा या गाण्याने चाहत्यांची मनं जिंकली. तिला आणखी एका महिला गायिकेने साथ दिली. या दोघींनी चेपॉक स्टेडियमवरील प्रेक्षकांची मने जिंकली.

रहमनाने गायलं माँ तुझे सलाम

सोनू निगमनंतर एआर रहमानने माँ तुझे सलाम या गाण्यावर परफॉर्म केले. त्याने आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ए आर रहमान याच्या सोबत मोहित चौहानही स्टेजवर उपस्थित आहे. मोहित चौहानने रहमानने संगीतबद्ध केलेल्या दिल्ली-६ चित्रपटातील मसकली गाणे गायले.

सोनू निगमनं जिंकली चाहत्यांची मनं

अक्षय-टायगरनंतर सोनू निगमने आपल्या आवाजाने चाहत्यांची मनं जिंकली. त्याने वंदे मातरम गाण्याने आपल्या गायनाची सुरुवात केली आणि चाहत्यांची मने जिंकली.

अक्षय कुमारचा दमदार परफॉर्मन्स

अक्षयने देसी बॉईजच्या सुबह होने ना दे या गाण्यावर परफॉर्म केले. त्यानंतर त्यांनी भूल भुलैया या गाण्यावर डान्स केला. पार्टी ऑल नाईट या गाण्यावरही अक्षय कुमारने डान्स केला. यानंतर तो चुरा के दिल मेरा गोरिया चली या गाण्यावरही थिरकला.

IPL २०२४ चा उद्घाटन सोहळा सुरू

IPL २०२४ चा उद्घाटन सोहळा सुरू झाला आहे. टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार परफॉर्म करत आहेत. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले आहे. अक्षय आणि टायगर थिरकाता दिसत आहेत.

थोड्याच वेळात IPL २०२४ चा उद्घाटन सोहळा-  IPL २०२४ चा उद्घाटन सोहळा संध्याकाळी ६.३० वाजेपासून सुरू होईल. उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार परफॉर्म करणार आहेत. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सोनू निगम आणि एआर रहमान यांसारखे अनेक बडे बॉलीवूड स्टार आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत.

तनुष कोटियन राजस्थान रॉयल्सच्या संघात - IPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमधून एक महत्त्वाची बातमी आली आहे. गुजरातने बीआर शरतचा संघात समावेश केला आहे. त्यांचा रॉबिन मिन्झ बाहेर आयपीएलमधून पडला आहे. तर राजस्थानने तनुष कोटियनचा (Tanush Kotian in rajastha royals) संघात समावेश केला आहे. ॲडम झाम्पा वैयक्तिक कारणांमुळे बाहेर आहे.

गेल्या वर्षी अरिजित सिंगने दाखवला होता जलवा- आयपीएलच्या गेल्या सीझनच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये लोकप्रिय गायक अरिजित सिंगने परफॉर्म केले होते. त्याच्यासोबत रश्मिका मानधना आणि तमन्ना भाटिया यांनीही परफॉर्म केले. मात्र यंदा परफॉर्मर्सच्या यादीत बदल करण्यात आला आहे. एआर रहमान आणि सोनू निगम यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अक्षय आणि टायगरही थिरकतील.

रवींद्र जडेजा सीसकेचा मॅच विनर- रवींद्र जडेजा या हंगामात सीएसकेसाठी चमत्कार करू शकतो. त्याने अनेक प्रसंगी शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. गेल्या मोसमाच्या अंतिम सामन्यातही जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ऋतुराज सीएसकेच्या कर्णधार-  आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ मोठ्या बदलांसह उतरतील. ऋतुराज गायकवाड आता CSK चे नेतृत्व करताना दिसणार आहे तर RCB नवीन नावाने फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.

धोनी कर्णधार नसल्याने चाहत्यांना धक्का- आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेत ऋतुराज गायकवाडची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. महेंद्रसिंह धोनी चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार नाही. या बातमीने सीएसकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. धोनीने २१२ सामन्यांमध्ये चेन्नईचे नेतृत्व केले. 

यातील १२८ सामन्यात संघाने विजयाची तर ८२ सामन्यात पराभवाची चव चाखली. त्याचवेळी दोन सामने अनिर्णित राहिले. चेन्नईने गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला होता.

सीएसके-आरसीबी हेड टू हेड- आयपीएलमध्ये चेन्नई आणि बंगळुरू आतापर्यंत ३१ वेळा आमनेसामने आले. यापैकी २० सामन्यात चेन्नईचा संघाने बाजी मारली. तर, आरसीबीला केवळ १० सामन्यात विजय मिळवता आला आहे. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला. दरम्यान, २००९ मध्ये चेन्नईने बंगळुरूचा ९२ धावांनी पराभव केला होता, जो दोन्ही संघांमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात १७ मार्च २०२३ रोजी शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने आरसीबीसमोर २२६ विशाल धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आरसीबीच्या संघाने लक्ष्य गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. अखेर सीएसकेने हा सामना ८ धावांनी जिंकला.

आरसीबी स्क्वाड- विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, रीस टोपली, टॉम करन, स्वप्नील सिंग, विजयकुमार वैशाक, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, विल जॅक्स, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, मनोज भंडागे, यश दयाल, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा.

सीएसके स्क्वाड- रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, महेश थीक्षाना, मोईन अली, डेव्हॉन कॉनवे, मुस्तफिजुर रहमान, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, शेख रशीद, निशांत सिंधू, अरावेली अवनीश.

Whats_app_banner