IPL 2024: आयपीएलच्या १७व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जचा सामना रायल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याशी होणार आहे. दोन्ही संघामध्ये अनुभवी खेळाडू आहेत. परंतु, चेन्नई आणि आरसीबीचा संघ आपपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल, याबाबत माहिती जाणून घेऊयात.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलच्या नव्या हंगामातील २१ सामन्यांचे अर्धवट वेळापत्रक जाहीर केले. हे सामने २२ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत खेळवले जातील. आयपीएल २०२४ मधील शेवटचा सामना २६ मे रोजी खेळला जाणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ मधील पहिला सामना शुक्रवारी (२२ मार्च २०२४) खेळला जाणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामना संध्याकाळी ८ वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल.जिओवर चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे. आपण हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये सामने पाहू शकणार आहेत. यासाठी कोणत्याही सब्स्क्रिप्शनची गरज लागणार नाही.
एमएस धोनी (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, डेव्हॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंह, प्रशांत सोळंकी, महेश राजेश सिंधू, मुकेश चौधरी, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अविनाश राव अरवेली.
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, कॅमेरून ग्रीन, विशक विजयकुमार, मनोज भंडागे, रजत पाटीदार, अनुज रावत, सुयश प्रबुदेसाई, आकाश दीप, रीस टोप्ले, राजन कुमार, हिमांशू शर्मा, कर्णधार शर्मा, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंह, सौरव चौहान.
संबंधित बातम्या