मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs RCB Head to Head : चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये कोण वरचढ? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

CSK vs RCB Head to Head : चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये कोण वरचढ? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 22, 2024 09:57 AM IST

Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru Head to Head Record: चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोणाचा वरचष्मा आहे, हे पाहुयात.

चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज आयपीएल २०२४ मधील पहिला सामना सामना खेळला जाणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज आयपीएल २०२४ मधील पहिला सामना सामना खेळला जाणार आहे.

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यातील सामन्याने आयपीएल सतराव्या हंगामाला आजपासून (२२ मार्च २०२४) सुरुवात होत आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ अनेकवेळा एकमेकांसमोर आले आहेत. मात्र, आतापर्यत कोणत्या संघाचे पारडे जड राहिले आहे, हे जाणून घेण्यासाठी दोन्ही संघाच्या हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकुयात.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळरू यांच्यातील पहिला सामना २८ एप्रिल २००८ रोजी खेळला गेला, जो बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. त्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूसमोर १७८ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, आरसीबीने हा सामना १३ धावांनी गमावला.

CSK vs RCB Live Streaming: फुटकात बघा चेन्नई- आरसीबी यांच्यातील क्रिकेटचा थरार; कधी, कुठे आणि कसे?

आयपीएलमध्ये चेन्नई आणि बंगळुरू आतापर्यंत ३१ वेळा आमनेसामने आले. यापैकी २० सामन्यात चेन्नईचा संघाने बाजी मारली. तर, आरसीबीला केवळ १० सामन्यात विजय मिळवता आला आहे. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला. दरम्यान, २००९ मध्ये चेन्नईने बंगळुरूचा ९२ धावांनी पराभव केला होता, जो दोन्ही संघांमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात १७ मार्च २०२३ रोजी शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने आरसीबीसमोर २२६ विशाल धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आरसीबीच्या संघाने लक्ष्य गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. अखेर सीएसकेने हा सामना ८ धावांनी जिंकला.

IPL_Entry_Point