CSK vs MI : नूर अहमदच्या जाळ्यात मुंबई इंडियन्स अडकली, सूर्या-रोहित सगळे फ्लॉप, सीएसकेसमोर सोपं लक्ष्य
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs MI : नूर अहमदच्या जाळ्यात मुंबई इंडियन्स अडकली, सूर्या-रोहित सगळे फ्लॉप, सीएसकेसमोर सोपं लक्ष्य

CSK vs MI : नूर अहमदच्या जाळ्यात मुंबई इंडियन्स अडकली, सूर्या-रोहित सगळे फ्लॉप, सीएसकेसमोर सोपं लक्ष्य

Published Mar 23, 2025 09:23 PM IST

IPL 2025, CSK vs MI : चेपॉकवर मुंबई इंडियन्सने २० षटकांत १५५ धावा केल्या. चेन्नईकडून नूर अहमदने ४ षटकांत केवळ १८ धावा देत ४ बळी घेतले. एमआयकडून तिलक वर्माने ३१ आणि सूर्यकुमार यादवने २९ धावा केल्या. खलील अहमदने ४ षटकांत २९ धावा देत ३ बळी घेतले.

CSK vs MI : नूर अहमदच्या जाळ्यात मुंबई इंडियन्स अडकली, सूर्या-रोहित सगळे फ्लॉप, सीएसकेसमोर सोपं लक्ष्य
CSK vs MI : नूर अहमदच्या जाळ्यात मुंबई इंडियन्स अडकली, सूर्या-रोहित सगळे फ्लॉप, सीएसकेसमोर सोपं लक्ष्य (REUTERS)

इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा तिसरा सामना आज (२३ मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असून यात सीएसकेने नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, यानंतर मुंबईने २० षटकात ९ बाद १५५ धावा केल्या आहेत. सीएसकेला विजयासाठी १५६ धावा करायच्या आहेत.

या सामन्यात मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली होती. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. यानंतर मुंबईने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ठराविक अंतराने विकेट पडत असल्याने अखेर संघ छोट्या धावसंख्येवर गडगडला.

मुंबईने ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. संघाकडून टिळक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. तर या एका सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा सूर्यकुमार यादव २९ धावा करून बाद झाला. शेवटी दीपक चहरने १५ चेंडूत २८ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला २० चा आकडा गाठता आला नाही.

चेन्नईसाठी मनगटी फिरकी गोलंदाज नूर अहमदने आपली जादू दाखवत ४ बळी घेतले. खलील अहमदने ३ बळी घेतले. तर नॅथन एलिस आणि अश्विनने १-१ विकेट घेतली.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिनेस, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि सत्यनारायण राजू.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस आणि खलील अहमद.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या