IPL 2024: कर्णधार ऋतुराज गायकवाडचे (Ruturaj Gaikwad) शतक आणि शिवम दुबेच्या (Shivam Dube) वादळी शतकाच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने (chennai super kings) लखनौसमोर (Lucknow Super Giants) २११ धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार रुतुराज गायकवाडने ६० चेंडूत १०८ धावांची खेळी केली, ज्यात १२ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. तर, शिवम दुबेने तीन आणि सात षटकाराच्या मदतीने अवघ्या २७ चेंडूत ६६ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे शतक झळकावले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर अजिंक्य रहाणेच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का बसला. त्यानंतर सहाव्या षटकात चेन्नईने दुसरी विकेट गमावली. डॅरिल मिशेल ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जाडेजाही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या वादळी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने लखनौसमोर २११ धावांचे लक्ष्य ठेवले. लखनौकडून मॅट हेन्री, यश ठाकूर आणि मोहसीन खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्यांदा एकमेकांच्या समोर आले. यापूर्वी लखनौच्या एकाना स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यात लखनौच्या संघाने चेन्नईला पराभूत केले होते. आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ ८ गुणांसहं चौथ्या स्थानावर आहे. तर, लखनौचा संघाचेही ८ गुण आहेत. परंतु, त्यांचा रनरेट चेन्नईपेक्षा खराब आहे. यामुळे लखनौचा संघ पाचव्या स्थानावर आहे.
अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकिपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.
संबंधित बातम्या