मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs LSG: मार्कस स्टॉयनिसची तुफानी फलंदाजी; २११ धावांचं लक्ष्य गाठलं, चेन्नईचा सहा विकेट्सनं पराभव

CSK vs LSG: मार्कस स्टॉयनिसची तुफानी फलंदाजी; २११ धावांचं लक्ष्य गाठलं, चेन्नईचा सहा विकेट्सनं पराभव

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 23, 2024 11:55 PM IST

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: आयपीएल २०२४ व्या सामन्यात लखनौ सुपर जायट्सने चेन्नई सुपरकिंग्जचा सहा विकेट्सने पराभव केला.

लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवला.
लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवला.

IPL 2024: मार्कस स्टॉयनिसच्या तुफानी शतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायट्सने चेन्नई सुपरकिंग्जने दिलेल्या २११ धावांचे लक्ष्य सहज गाठले. लखनौ सुपर जायंट्सने चेन्नईविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. लखनौ घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात लखनौने चेन्नईचा आठ विकेट्सने पराभव केला. त्यानंतर चेन्नईला त्यांच्याच होम ग्राऊंड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर हरवले.या पराभवासह चेन्नई सुपरकिंग्जचा संघ गुणतालिकेच्या टॉप- ४ मधून बाहेर पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

IPL_Entry_Point