CSK vs LSG: चेन्नईचा ६ विकेट्सने पराभव, लखनौच्या मार्कस स्टॉयनिसची एकतर्फी झुंज
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Csk Vs Lsg: चेन्नईचा ६ विकेट्सने पराभव, लखनौच्या मार्कस स्टॉयनिसची एकतर्फी झुंज
चेन्नई- लखनौ सामन्यातील लाईव्ह अपडेट्स येथे पाहा
चेन्नई- लखनौ सामन्यातील लाईव्ह अपडेट्स येथे पाहा

CSK vs LSG: चेन्नईचा ६ विकेट्सने पराभव, लखनौच्या मार्कस स्टॉयनिसची एकतर्फी झुंज

Ashwjeet Rajendra Jagtap 06:06 PM ISTApr 23, 2024 11:36 PM
  • twitter
  • Share on Facebook

चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यातील लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Tue, 23 Apr 202405:03 PM IST

स्टॉयनिसची तुफानी फलंदाजी

नऊ षटकांनंतर लखनौने दोन विकेट गमावून मोबदल्यात ७८ धावा केल्या. सध्या देवदत्त पडिक्कल १३ चेंडूत ११ धावा तर मार्कस स्टॉयनिस २५ चेंडूत ४९ धावा करत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये २७ चेंडूत ४५ धावांची भागीदारी झाली आहे. स्टॉयनिसने सहा चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. लखनौला आता ६६ चेंडूत १३३ धावांची गरज आहे.

Tue, 23 Apr 202403:59 PM IST

CSK vs LSG Live: लखनौला विजयासाठी २११ धावांची गरज

चेन्नईच्या चेपॉक येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात लखनौला विजयासाठी २११ धावांची गरज आहे.

Tue, 23 Apr 202403:43 PM IST

Ruturaj Gaikwad Century:  ऋतुराज गायकवाडचे शतक

कर्णधार ऋतुराजने ५६ चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने १८ व्या षटकात यश ठाकूरला चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. या मोसमातील हे सहावे शतक ठरले. १८ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १७८ धावा आहे. ऋतुराज ५८ चेंडूत १०७ धावा करत असून शिवम दुबे १८ चेंडूत ३९ धावा करत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये ३७ चेंडूत ७७ धावांची भागीदारी झाली आहे.

Tue, 23 Apr 202402:55 PM IST

Ruturaj Gaikwad Half Century: कर्णधार ऋतुराजचे अर्धशतक

कर्णधार रुतुराज गायकवाडने २८ चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावले. ऋतुराज यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने कर्णधारपदाची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे आणि त्याच्या फलंदाजीत दडपण येऊ दिलेले नाही. नऊ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ७४ धावा आहे. सध्या ऋतुराज ५० आणि जडेजा ११ धावा करून क्रीजवर आहे.

Tue, 23 Apr 202402:40 PM IST

CSK vs LSG: डॅरिल मिशेल पॅव्हेलियनमध्ये परतला

चेन्नई सुपर किंग्जला सहाव्या षटकात 49 धावांवर दुसरा धक्का बसला. यश ठाकूरने डॅरिल मिशेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दीपक हुडाने मिशेलचा अप्रतिम झेल घेतला. त्याने 10 चेंडूत 11 धावांची खेळी खेळली. मिचेलने कर्णधार रुतुराजसोबत 45 धावांची भागीदारी केली.

Tue, 23 Apr 202402:12 PM IST

CSK vs LSG Live Score: चेन्नईने पहिली विकेट गमावली, अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद

पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेन्नईला पहिला धक्का बसला. मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर सलामीवीर अजिंक्य रहाणे झेल बाद झाला.सध्या कर्णधार रुतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल क्रीजवर आहेत.

Tue, 23 Apr 202402:12 PM IST

CSK vs LSG Live Score: चेन्नईने पहिली विकेट गमावली, अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद

पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेन्नईला पहिला धक्का बसला. मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर सलामीवीर अजिंक्य रहाणे झेल बाद झाला.सध्या कर्णधार रुतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल क्रीजवर आहेत.

Tue, 23 Apr 202402:08 PM IST

LSG Playing 11: लखनौची प्लेईंग इलेव्हन

केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आशुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी विश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

Tue, 23 Apr 202402:06 PM IST

CSK Playing 11: चेन्नईची प्लेईंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरेल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, एम पाथीराना.

Tue, 23 Apr 202402:06 PM IST

CSK vs LSG:  चेन्नई संघात एक बदल

चेन्नई सुपर किंग्जने आज त्यांच्या संघात बदल केला आहे. अनेक सामने फ्लॉप ठरलेल्या रचिन रवींद्रला वगळण्यात आले असून डॅरेल मिशेलला संधी देण्यात आली आहे.

Tue, 23 Apr 202402:05 PM IST

CSK vs LSG: नाणेफेक जिंकून लखनौचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

 लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौने संघात कोणताही बदल केलेला नाही.

Whats_app_banner

विभाग